Sunday, 16 July 2023

श्रावण बाळ योजना लाभार्थींना केंद्राचे दोनशे रुपये कमी !

श्रावण बाळ योजना लाभार्थींना केंद्राचे दोनशे रुपये कमी !

*शेतमजुरांमध्ये असंतोष.. लाल बावटा चा आंदोलनाचा इशारा*

चोपडा, प्रतिनिधी .. महाराष्ट्रात विविध सामाजिक योजना अंतर्गत वयोवृद्ध, दिव्यांग, निराधार, विधवा, दुर्धर आजाराने पीडित लोक यांना श्रावण बाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी, वृद्धापकाळ या योजना अंतर्गत 1 हजार रुपये मिळतात त्यातील श्रावण बाळ योजनेत दारिद्र रेषेखालील लोकांना राज्य सरकार आठशे रुपये व केंद्र सरकार दोनशे रुपये देतो अशी एकूण 1 हजार रुपये मानधन दिले जाते. 

परंतू कैक महिनेपासून केंद्राकडून मिळणारी दोनशे रुपये मिळत नाहीत. अशा शेतकरी, शेतमजुरांच्या तक्रारी असून त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, अलीकडे त्यांना राज्य सरकारचेच फक्त आठशे रुपये मानधन मिळते. बाकीच्या योजनांमध्ये मात्र लाभार्थीना 1 हजार रुपये बरोबर मिळतात. तर काहींना फक्त आठशे रुपये मिळतात. केंद्र सरकारने तर कैक महीनेपासून दोनशे रुपये अनुदानच महाराष्ट्र शासनाकडे दिलेले नाही. त्यामुळे आठशे रुपये मिळतात. 

              राज्य सचिव, अमृत महाजन - (लालबावटा शेतमजूर युनियन)

सबका साथ सबका विकास गप्पा मारणारे मोदी सरकार नेमक्या शेतमजूर शेतकरी यांचे मुळावरच का उठले? केंद्र सरकार मानधन, अनुदान का वेळेवर देत नाही याबद्दल गरीब लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तरी फरकासह केंद्र सरकारने या शेतकरी शेतमजुरांचे मानधन अदा करावे. तसेच गेल्या दहा वर्षापासून या मानधनात केंद्र सरकारने भत्ता वाढवलेला नाही. त्यात केंद्र सरकारने वाढ करून शेतकरी शेतमजुरांना किमान तीन हजार रुपये पेन्शन द्यावे अशी मागणी लालबावटा शेतमजुर युनियनने एका जाहीर पत्रका द्वारे केली आहे. पत्रकात पुढे म्हटले आहे की, त्यातल्या त्यात राज्य सरकारांनी स्वतःची रक्कम टाकून बऱ्यापैकी मानधन वयोवृद्ध, दिव्यांग, विधवा यांना मिळते. अलीकडे त्यात महाराष्ट्र सरकारने पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे. ती वाढ देखील ताबडतोब अदा करावी. या प्रश्नावर लाल बावटा शेतमजुर युनियन आंदोलन उभे करेल, असा इशारा युनियनचे राज्य सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी पत्रकात दिला आहे..

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...