Sunday, 16 July 2023

गोवेली पिंपळोली येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला वादळी पावसामुळे भूईसपाट, हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने 'जगाव की मरावं, अशी स्थिती !

गोवेली पिंपळोली येथील शेतकऱ्यांचा भाजीपाला वादळी पावसामुळे भूईसपाट, हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने 'जगाव की मरावं, अशी स्थिती !

कल्याण, (संजय कांबळे) : मुंबई वडोदरा एक्स्प्रेस मधून वाचलेल्या शेतीत भाजीपाला पिक घेतले, अपार कष्ट केल्याने पिक देखील चांगले आले, चारपाच दिवसात भाजीपाल्याचा तोडा करायचा असे निर्णय घेतला तोच, दोनच दिवसात आलेल्या वादळी पावसामुळे हातातोंडाशी आलेले भाजीपाला पिकं आडवे झाले. यासाठी घातलेला संपूर्ण मांडवच खाली कोसळला, त्यामुळे गोवेली पिंपळोली गावातील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांच्या पुढे जगावं की मरावं असा प्रश्न उभा ठाकला असून उघड्या डोळ्यांनी भाजीपाला पिकांकडे बघून डोळ्यातून 'आसवांना, वाट मोकळी करून देत आहेत.

कल्याण तालुक्यातील मुंबई नागपूर समृद्ध महामार्ग व मुंबई वडोदरा एक्स्प्रेस ने अनेकांचे संसार उध्दवस्त केले, याच वडोदरा  एक्स्प्रेस मध्ये गोवेली पिंपळोली येथील प्रगतीशील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांची ३८ गुंठे शेती गेली, राहिलेल्या ५३ गुंटे जमीनीवर दोन मुले सुना व नातवंडे असे कुंटूब अवलंबून आहे. त्यामुळे शेती, भाजीपाला, यावर पोट भरायचे !

असा निश्चय करून माळरानावर असलेल्या २०/२५ गुंठे शेतीत भाजीपाला लागवड केली, सुरुवातीला चवळी, सिमला मिरची चे पिक घेतले पण बाजारभावच न मिळाल्याने घातलेला खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे थोडाफार बाजाराचा अंदाज घेऊन मे महिन्यात काकडी, गोसाळी व शिरोली (दोडके) या पिकाची लागवड केली. यासाठी मांडव घालण्यासाठी एक महिना ३/४ मजूर घेतले, स्वतः व मुले शेतात राबून अपार कष्ट केल्याने पिक चांगले आले.

वेलीवर काकड्या, गोसाळी, शिरोली डौलाने डोलत असल्याचे पाहून आपल्या कष्टाचे चिज होणार, असे रोहणे यांना वाटू लागले, घडलेही तसेच पहिलाच काकडी व गोसाळी चा तोडा केला तर तब्बल ४/५ क्विंटल निघाला, पिक चांगले असल्याने बाजारभाव देखील १०/१२ हजार रुपये भेटला, कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई अशा बाजारपेठा जवळ असल्याने तेथील व्यापारी डायरेक्ट शेतीच्या बांधावर येवून माल मागू लागले, श्रावण महिना सुरू होत असल्याने भाजीपाल्याला मागणी वाढणार आता आपल्याला सुखाचे दिवस येणार असे वाटत असतानाच कालपरवा आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण भाजीपाला मांडव आडवा झाला, क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. 

हातातोंडाशी आलेले पिक असे चिखलात पडलेले पाहून मधुकर रोहणे यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कधी भाजीपाला पिकाकडे तर कधी आकाशाकडे बघून डोक्यावर मारून घेत होते. वेगवान निर्णय व गतीमान सरकारने काही तरी मदत करावी किंवा आम्ही जगावं की मरावं हे  तर सांगावे  अशी विंनती ते करत होते.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...