Sunday, 16 July 2023

मोहने येथील रस्त्याचे तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !!

मोहने येथील रस्त्याचे तसेच प्रभाग क्रमांक 12 मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न !!

कल्याण , नारायण सुरोशी : मोहने येथील एस.आर. त्रिकोण ते स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता व प्रभाग क्रमांक.१२ मधील ५०.०० लक्ष रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले. प्रभाग क्र-१३, मोहने येथील एस.आर.त्रिकोण ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख श्री. अंकुश जोगदंड यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत आमदार विशेष निधीतून रु.५०.०० लक्ष मंजूर केले आहेत.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर होत असून सदर विकास कामे करीत असताना कोणताही दुजाभाव न करता मोहने येथील विविध विकास कामांकरिता निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही या भूमिपूजन समारंभाच्या वेळी उपस्थित नागरिकांना दिली.

या भूमिपूजन समारंभास, शिवसेना विधानसभा संघटक तथा मा.नगरसेवक श्री.मयूर पाटील, उपशहर प्रमुख श्री.अंकुश जोगदंड, उपविभाग प्रमुख श्री.नाना काटकर, शाखाप्रमुख राजा पाटील, श्री. प्रभात मिश्रा, श्री. महेश पाटील, उपशाखा प्रमुख श्री. अशोक कदम, श्री. राजेश साबळे, श्री. पिंट्या गजगाड, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख चेतन कांबरे, मोहोने टिटवाळा युवासेना शहरप्रमुख दिनेश निकम, विधानसभा सहसंघटक श्री. विजय परीयार, महिला उपशहर संघटक सौ.सुनिताताई राठोड, विभाग संघटक सौ. मंगळताई आल्फन्सो, शाखा संघटक सौ.मालाताई सकपाळ, युवासेना विभाग प्रमुख चेतन बळुरंगी, तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...