Friday, 21 July 2023

मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच !!

मुंबई, ठाणे येथे मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरूच !!


मुंबई, प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा शनिवारी (दि. २२) आजही सुरूच आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्यातील बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शुक्रवारीही मुंबई आणि ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, वसई, नालासोपारा तसेच ठाणे, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित झाली, तसेच अनेक घरांत पाणी गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. 

हवामान विभागाने 25 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. पण आता नवीन अंदाजानुसार, 25 जुलैनंतरही पावसाचा जोर कायम रहाण्याची शक्यता आहे.

नदी, नाले व ओढयाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदिपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडु नये, पुल पाहण्यासाठी गर्दी करु नये, जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीचा आश्रय घेऊ नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रत्येक नागरीकांनी दामीनी अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्यावे. आपतकालीन परिस्थीतीत जवळचे तहसील कार्यालय, नगरपालिका, महानगरपालिका, पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...