Thursday, 20 July 2023

कल्याण तालुक्यातील चारही नद्यावरील पुलाचा मार्ग बिकट, रस्त्यावर खड्डे, नागरिकांचे हाल !

कल्याण तालुक्यातील चारही नद्यावरील पुलाचा मार्ग बिकट, रस्त्यावर खड्डे, नागरिकांचे हाल !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील बारवी, उल्हास, काळू आणि भातसा या चार नद्यावरील महत्त्वाच्या मार्गावरील पुल हे नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बिकट अवस्थेत गेले असून रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने यामध्ये नागरिकांचे प्रंचड हाल होत आहे.
तालुक्यात कल्याण नगर या मुख्य मार्गावर उल्हास नदीवर रायते येथे ब्रिटिश कालीन पुल आहे, टिटवाळा बदलापूर या रस्त्यावर दहागांव मध्ये बारवी नदीवर पुल आहे, तर काळू नदीवर टिटवाळा शहापूर ला जोडणारा रुंदा पुल आहे, खडवली येथे भातसा नदीवर टिटवाळा शहापूर, पडघा, मुंबई नाशिक महामार्ग येथे जाण्यासाठी पुल आहे. यातील रायते येथील उल्हास नदीवरील पुल सोडला तर इतर ३ पुल हे अंत्यत कमी उंचीचे आहेत. त्यामुळे थोडाफार पाऊस पडला तरी यावरून पाणी वाहते व हे मार्ग बंद होतात.

मात्र नुकताच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे या चारही नद्या ना मोठा पूर आला होता. अनेक मुख्य व इतर मार्ग ठप्प झाले होते. समुद्राच्या भरतीनंतर ओहटी सुरू झाली व नदीच्या पाण्याने प्रंचड वेगाने निचरा सुरू झाला. यामुळे नदीच्या पाण्यात वाहून आलेल्या झाडे व इतर वस्तू मुळे रायते पुलाचे दोन्ही बाजूला असलेले सरक्षंक खांब वाहून गेले, अशीच परिस्थिती दहागांव, रुदा, खडवली, या पुलाची झाली. त्यामुळे हे तातडीने दुरुस्त न केल्यास पुन्हा या नद्यांना पुर आला तर मात्र स्थिती अधिक धोकादायक होऊ शकते.
पावसाने केवळ नदीवरील पुलाचींच अवस्था बिकट केली नाही तर कल्याण- नगर, टिटवाळा- शहापूर, बदलापूर, कल्याण कर्जत, मुंबई- नाशिक, अश्या विविध मार्गाची दाणादाण उडवली अनेक ठिकाणी इतके मोठे खड्डे पडले आहेत की कधीही काहीही होऊ शकते. अशातच मुंबई वडोदरा एक्स्प्रेस, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग या रस्त्यावरील मोठमोठ्या आयवा गाड्या चिखलासह या रस्त्यावर येतात, त्यादेखील अपघताचे कारण ठरु शकतात. नुकतेच करोडो रुपये खर्च केलेला म्हारळपाडा ते पाचवामैल या दरम्यान सिंमेट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी अर्धवट काम झाले आहे. कांबा स्मशानभूमी जवळील मोठा नाला तसाच उघडा आहे हे अतिशय जीवघेणे होऊ शकते. याचा वेगवान प्रशासनाने गतीमान निर्णय घ्यायला हवा, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील,दिपक भोईर,परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी !!

महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील,दिपक भोईर,परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी !! ** जनतेचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद ** महाविकास आघाडीच्या उमे...