Friday, 21 July 2023

जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीबाबत उपाययोजनांचा उद्या पालकमंत्री शंभूराज देसाई घेणार आढावा !

जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीबाबत उपाययोजनांचा उद्या पालकमंत्री शंभूराज देसाई घेणार आढावा !

ठाणे, दि. २१ - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थिती संदर्भात आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे उद्या दि.२२ जुलै २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घेणार आहेत.
     जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या दु.३ वा होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व महापलिकांचे आयुक्त यांच्यासह जिल्ह्यातील महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन,  जिल्हा परिषद यासह राज्यस्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...