Friday 28 July 2023

मुलुंडच्या कामगार रुग्णालयात अस्वच्छता, इमारत मोडकळीस !!

मुलुंडच्या कामगार रुग्णालयात अस्वच्छता, इमारत मोडकळीस !!

*व्यवस्थापनाला मनसेचा अल्टिमेटम* 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

               मुलुंड येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात सध्या ऐन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य वाढून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे रुग्णालय इमारत मोडकळीस आली असून, ती धोकादायक अवस्थेत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धडक देऊन प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी उद्यापासून कार्यवाहीस सुरुवात करू असे आश्वासन या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. मुलुंडच्या या (ई एस आय सी) राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात कामगारांनाही सध्या अनेक असुविधा भेडसावत आहेत. तर रुग्णालयातील अस्वच्छता दिवसेंदिवस ऐन पावसाळ्यात वाढत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी करत येथील परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. यावेळी रुग्णालयात रोज साफसफाई आणि स्वच्छता ठेवत कामगारांच्या उपचारासाठी निर्माण होणाऱ्या समस्या येत्या १५ दिवसात सोडवाव्यात अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. त्यावर डॉ विलास डोंगरे यांनी उद्यापासून याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी दिली आहे.
                मुलुंड येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील भिंती, जीने तसेच दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून पडणारे सिमेंटचे प्लास्टर रुग्णालयातच पडून आहे. औषधांचे स्टोअर्स अस्वच्छ असून, कामगारांना औषध नीटपणे मिळत नसल्याची तक्रार मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांच्याकडे कामगारांनी केली. त्यामुळे आज मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यावेळी रुग्णालयात सगळीकडे अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले अशी माहिती राज पार्टे यांनी दिली. तर यावेळी  रुग्णालयाच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या असेही त्यांनी दिली.  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस विजय निकम, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप गुप्ता, शाखाध्यक्ष सर्वेश अंबोलकर, उपचिटणीस सुयोग शिवगण, महाराष्ट्र सैनिक रुपेश कांबळे आदी सह, सर्व कामगार उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...