राज्यात ऑरेंज अलर्ट कायम, आजही मुसळधार पावसाची शक्यता - हवामान खाते
पुणे , प्रतिनिधी : मुंबईसह राज्याला देण्यात आलेला पावसाचा इशारा गुरुवारीही कायम राहणार आहे. विशेषत: कोकणात पावसाचा धुमाकूळ कायम राहणार असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना देण्यात आलेला 'ऑरेंज अलर्ट' कायम आहे. तर सोबत पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांनाही 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, या सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत राज्यात मान्सून सक्रिय आहे. दक्षिण कोकण आणि उत्तर कोकणावर पावसाचे ढग आहेत. या भागांत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. बुधवारी सकाळपासून रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे.
No comments:
Post a Comment