ठाणे जिल्ह्यात पावसाने उडवली दाणादाण, मानवी चुकांचा महापूर, नागरिकांना मनस्ताप !
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ,कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आदी तालुक्यात दाणादाण उडवून दिली, यामध्ये कोणाचे जीव गेले, गाड्या वाहून गेल्या, कित्येकांच्या घरात पाणी शिरले, तर अनेकांना छातीभर पाण्यातून वाट काढत कसेबसे घर गाठावे लागले, या सर्वामागे नैसर्गिक आपत्ती आहेच, पण त्यानिमित्ताने अनेक मानवी चुकांचा महापूर आल्याचे दिसून आले व याचा सर्वाधिक त्रास नागरिकांना झाला.
ठाणे जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडवून दिली, एकट्या कल्याण तालुक्यात १४९ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सुमारे १०४५ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. साहजिकच तालुक्यात चारही नद्याना पूर आला. अंबरनाथमध्ये वसार गावातील चंदन झा नावाचा तरुण वाहून गेला, वडोलगावातील टेम्पो वाहून गेला, सुदैवाने ड्रायव्हर वाचला, अंबरनाथ मधला राईल शेख हा तरुण बुडाला, रोहन अंताडे येथे झोपडी पडली, अशा एक ना अनेक घटना घडल्या, हे जरी खरे असले तरी बहुतांश ठिकाणी मानवी चुकांमुळे सर्वाधिक फटका बसला असल्याचे समोर येत आहे. प्रथम म्हणजे सर्व महापालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची केल्याचे अगदी ठासून सांगितले, वेळप्रसंगी कागदी घोडे नाचवले, लाखो रुपये खर्च दाखवला, तो पावसाने उघडा पाडला.
तालुक्यातील कल्याण नगर मार्ग प्रथम म्हारळ, वरप, कांबा, येथे नुकत्याच केलेली सिंमेट काँक्रीट च्या रस्त्यावर पाणी भरल्याने बंद झाला. या रस्त्यावर आतापर्यंत कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. टाटा पावर हाऊस येथे एक व्यक्ती जीव वाचवा म्हणून ओरडत होता, त्याला लवकर मदत मिळाली नाही. याच परिसरात अनेक बिल्डर मंडळींनी नैसर्गिक नाले आडविले आहे, मोठ्या प्रमाणात भरणी केली आहे, पावशेपाडा येथे सेंच्युरी रेआँन कंपनीच्या बिट्स मँनेजमेन्ट ने केलेल्या माती भरणीमुळे या गावसह कांबा, मानिवली, वरप, म्हारळ, आदी गावाना फटका बसला आहे.
म्हारळ गावातील आण्णासाहेब पाटील नगर येवून वाहणारा १५/२० फुटांचा नैसर्गिक नाला पुढे अनुसयानगर येथे १ फुटांचा झाला आहे. यामुळे, क्रांतीनगर, साईदिप काँलनी दशरथ नगर, आदी भागातील नागरिकांना पाण्याचा फटका बसला. एवढेच नव्हे तर अनेक धनिकांनी नदीच्या पात्रात बांधकामे केली आहेत. आणि हे आपल्या लोकप्रतिनिधी व महसूल विभागाना माहिती नाही असे मुळीच नाही, मग नदीचे पाणी जाणार कुठे? आज आपल्या देशाचे राज्यकर्ते डिजिटल इंडिया, म्हणून छाती बदडून घेत आहेत, पण जिथे नेटवर्क सोडाच, पायी जाण्यासाठी रस्ता नसेल तर काय? हे नुकत्याच घडलेल्या खालापूर मधील इशाळवाडी दुर्घटनेनंतर दिसून येते. आजही जिल्ह्यात माळशेज घाटात अशा कितीतरी वाड्या वस्त्या आहेत जिथे रस्ता नाही, सध्या दुसऱ्या दिवसानंतर देखील जिल्ह्यातील अनेक मुख्य व अंतर्गत मार्ग बंद आहेत. याचा त्रास कोणाला होता? अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन चे टिम पोहचू शकते नाही, तेथे स्थानिक लोकांच्या मदतीने अनेकांचे जीव वाचविले जात आहेत. मग वर्षभर आपत्ती व्यवस्थापन काय करत होते? असे एक ना एक असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
No comments:
Post a Comment