Wednesday, 19 July 2023

मार्लेश्वर पंचक्रोशीतील व मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सावधानता बाळगावी - श्री.अमित रेवाळे

आंगवली येथे बावनदीचे पाणी रस्त्यावर !!

मार्लेश्वर पंचक्रोशीतील व मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सावधानता बाळगावी - श्री.अमित रेवाळे

कोकण, (शांताराम गुडेकर) :

        रत्नागिरी जिल्ह्यातील सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बावनदी पात्राचे पाणी आंगवली दिवाणमळा येथे रस्त्यावर आल्याने मार्लेश्वर तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या भाविकांनी व आंगवली ते मार्लेश्वर परिसरातील ग्रामस्थांनी दिवानमळा येथून येताना काळजी घ्यावी असे आवाहन श्री.अमित रेवाळे-- विभाग अध्यक्ष मनसे (ओझरे जिल्हा परिषद गट) यांनी केले आहे.

          संगमेश्वर तालुक्यातील देवरुख -मार्लेश्वर रोडवरील आंगवली दिवाणमळा येथे बावनदी चे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे वाहन चालवताना परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी व नदीच्या पाण्याचा व पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक विभाग अध्यक्ष श्री.अमित रेवाळे यांनी केले आहे, तसेच गेले कित्येक वर्षे या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे व याच ठिकाणा दरम्यान काही वर्षांपूर्वी आंगवली येथील एक ग्रामस्थ वाहून गेल्याने पंचक्रोशीतील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नदीच्या काठावर रस्ता असल्याने दरवर्षी ही पूर परिस्थिती निर्माण होते तरी स्थानिक प्रशासन व निवडून दिलेले पुढारी यांनी या विषयाची दखल घेऊन यावर पर्याय काढणे अगत्याचे आहे अशी विनंती स्थानिक प्रशासनास श्री.रेवाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...