मुंबईसह ठाणे, कल्याण येथे मुसळधार पाऊस, रेल्वे सेवा ठप्प !
*ठाकुर्ली- कल्याण दरम्यान घडली दुर्दैवी घटना*
कल्याण, नारायण सुरोशी : मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरात अक्षरश: कहर केला आहे. मुंबईनजीकच्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण ते कर्जत, कसारापर्यंत सध्या तुफान पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे.
कल्याण स्थानक परिसरासह मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवर बरंच पाणी साचलं आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी आहे. दुपारी एक वाजेपासून डोंबिवलीपासून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली होती.
याचवेळी एक अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ लोकल ट्रेन ही ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान सुमारे दोन तास उभी होती. त्यामुळे काही प्रवाशी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यातच एक चार महिन्यांचं बाळ घेऊन एक काका आणि त्या बाळाची आई देखील ट्रेनच्या बाजूने चालत होते. पण अचानक त्या काकाच्या हातातून चार महिनाचं बाळ सटकला आणि थेट त्या वाहत्या पाण्यात पडलं. ज्यानंतर बाळाच्या आईने एकच टाहो फोडला.
Very sad I don't have any words to tell very very sorry for child heartily condolence for child
ReplyDelete