Wednesday, 19 July 2023

विनवळ येथे पिक विमा शिबीराचे आयोजन !

विनवळ येथे पिक विमा शिबीराचे आयोजन !

जव्हार,:जितेंद्र मोरघा :

तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीकांचा पीक विमा ३१ जुलैपर्यंत एक काढून घेण्याचे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडुन करण्यात येत आहे.जव्हार तालुक्याल विनवळ ग्रामपंचायत येथे आज पीक विमा योजनेचा शिबीर आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेतकर्‍यांनी पीक विमा साठी बहुसंख्येने शैतकर्‍यांनी उपस्थिती नोंदवीली, जव्हार कृषी कार्यालयातील अधिकार्‍यांनी शैतकर्‍यांना पिक विम्या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो. अशा वेळी शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारच्या वतीने 'पंतप्रधान पीक विमा योजना' सुरू करण्यात आली. या पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा काढून मिळणार आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. या पिकाला संरक्षण मिळावे, यासाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकासाठी संरक्षित असणारी रक्कम मिळणार असून, या वर्षापासून एका पिकाला केवळ एक रुपया लागणार आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...