कल्याण तालुक्यातील तीनशेच्या आसपास लोकांचे स्थंलातर, म्हारळ, कांबा ग्रामपंचायत हद्दीत पावसाने हाहाःकार !!
कल्याण, (संजय कांबळे) : रात्री पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांना पुर आला असून समुद्राच्या भरतीमुळे म्हारळ गावातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले, कल्याण मुरबाड महामार्ग पाण्याखाली गेला आहे, कांबा ग्रामपंचायत हद्दीतील मोरया नगर मध्ये देखील पुराचे पाणी भरल्याने म्हारळ मधील २०० तर कांबा मधील १०० अशी ३०० कुटूंबाचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थंलातर करण्यात आले आहे, तर ५०० च्या आसपास लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या रात्री पासून कल्याण परिसरात तूफान पाऊस पडत आहे. यामुळे उल्हास, भातसा, काळू व बारवी नद्यांना पूर आल्याने ही पुल पाण्याखाली गेले असल्याने हे मार्ग ठप्प झाले. प्रथम रायते आपटी मार्ग पाण्याखाली गेला, त्यानंतर, बदलापूर, शहापूर हे मार्ग बंद झाले, मुसळधार पाऊस व त्यातच समुद्राच्या भरतीची भर पडल्याने म्हारळ गावातील सर्व भागात ३/४ फुटांपर्यंत पाणी भरले, येथील लोकांना वाचवण्यासाठी एनडिआरफ च्या टिम ला बोलावण्यात आले, २० लोकांची टिम दाखल झाली, गावातील वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या सुमारे २०० कुंटूबाचे स्थंलातर ं अंगणवाडी व प्रिती अँकेडमी शाळेत करण्यात आले असून त्यांच्या ५०० लोकांची रात्रीची जेवणाची व राहण्याची सोय ग्रामपंचायत म्हारळ कडून करण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक वरीष्ठ अधिका-यांनी येवून पुर परिस्थिती ची पाहणी केली.
कांबा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मोरया नगर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी ७९ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थंलातर केले. तर १७ लोकांची सोय केली,
महसूल विभागाचे कल्याण प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार, जयराज देशमुख, मंडल अधिकारी, तलाठी, तसेच कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण, वरप ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री पाखरे, म्हारळ च्या सरपंच निलिमा म्हात्रे, सदस्य संदिप पावशे, म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी सर्व वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुर परिस्थिती व नागरिकांची सोय कशी होते याची पाहणी करत होते. एकूणच आजच्या पावसाने जनता व प्रशासन यांची चांगली च धावपळ करुन दाणादाण उडवून दिली. समाधानाची बाब म्हणजे समुद्राची ओहटी सुरू झाल्याने अनेक ठिकाणी पाणी ओसरु लागल्याचे चित्र दिसत होते.
No comments:
Post a Comment