Wednesday, 19 July 2023

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ !

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांवर खड्डे बुजविण्याची वेळ !

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. या खड्ड्यांनी वाहतूक कोंडी होत आहे. 

या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ही परिस्थिती पाहता तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच कंबर कसली असल्याचे चित्र दिसत आहे. 

कल्याण तसेच डोंबिवली वाहतूक विभागाने रस्त्यावर उतरत काही महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डे हे स्वतः तात्पुरत्या स्वरुपात त्यात भराव टाकून स्वखर्चाने बुजविले आहेत. कल्याण शिवाजी चौक, डोंबिवलीतील टिकळ चौक आदि भागातील खड्डे वाहतूक विभागाने भरुन काढले आहेत. 

नागरिकांकडून वाहतूक पोलिसांचे कौतुक करण्यात आले तसेच महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...