कोकण युवा सेवा संस्था ( रजि.) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!
मुंबई, ( दिपक कारकर ) -
उपरोक्त संस्थेच्या माध्यमातून दि.२५ जून २०२३ रोजी भाताने गाव (वसई) येथील साई आधार आश्रम येथे शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वितरण करण्यात आले. या मदतकार्यात अनेकांनी फुल ना फुलाची पाकळी देऊन आपले कर्तव्य बजावण्याचा छोटासा प्रयत्न कोकण युवा सेवा संस्था ( रजि. ) या संस्थेच्या माध्यमातून केला आहे.
सदर उपक्रमाला कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष -अभिजित कोटकर खजिनदार- संजना बेंद्रे, मुंबई संघटक-अनिल गावडे, नालासोपारा शहर प्रमुख - कमलेश खेडेकर, रत्नागिरी जिल्हा संघटक- सतीश सुर्वे, रायगड जिल्हा संघटक महेंद्र घडशी, निर्मला दाभोळकर, महेश सुर्वे, अमोल सालकर, रुपेश कोलते, मनोज सार्दळ, अविनाश बेर्डे, दिनू कोटकर (लांजा), सौ.जयंती गणेश, रुपेश चाचे, जयदेश चव्हाण, प्रशांत गवस, अमर खेरटकर, वर्षा महेंद्र चव्हाण व दयानंद सोनताटे उपस्थित होते आणि कोकण युवा सेवा संस्थेच्या वतीने संस्थापक /अध्यक्ष अभिजित कोटकर यांच्या हस्ते साई आधार चे सर्वेसर्वा विशाल परुळेकर यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन "समाजरत्न" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment