Saturday, 5 August 2023

गोवेली ग्रामीण रुग्णालय असुविधेच्या गर्तेत, ड्रेनेज लाईन खोदल्यामुळे चार महिन्यापासून शौचालयाला ठाळा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष !

गोवेली ग्रामीण रुग्णालय असुविधेच्या गर्तेत, ड्रेनेज लाईन खोदल्यामुळे चार महिन्यापासून शौचालयाला ठाळा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यासह शेजारच्या ६०/७० गावातील लोकांच्या आरोग्याचा मुलभूत आधार ठरलेल्या ग्रामीण रुग्णालय सध्या विविध असुविधेच्या गर्तेत सापडले असून रुग्णालयाची ड्रेनेज लाईन खोदून ठेवल्याने गेल्या ३/४ महिन्यापासून रुग्णालयातील शौचालयांना ठाळा लावला आहे. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीना सामोरं जावं लागत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वेळ रुग्णांवर आल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे इतकी मोठी अडचण निर्माण झाली असताना ही येथील नेते, पुढारी, मंत्री, आमदार काय करतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कल्याण मुरबाड, कल्याण शहापूर मार्गावर गोवेली या मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, जवळपासच्या ६० ते ७० गावातील लोक या रुग्णालयात विविध उपचार घेण्यासाठी येत असतात, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी, मजूर इत्यादी सर्वसामान्य नागरिकांना हे रुग्णालय मोठा आधार वाटते,या रुग्णालयात पुरुष, स्त्री वार्ड, प्रयोगशाळा, एक्सरे, प्रसुती कक्ष, नर्सेस रुम, ओपीडि, एन सी,डी काँर्नर, आयुष्य विभाग, स्टोअर रुम, अपघात मलमपट्टी विभाग, वैद्यकीय अधिकारी कक्ष, ड्युटी अधिकारी कक्ष, आदी २० ते २२ कक्ष आहेत. आतापर्यंत अंत्यत नामांकित वैद्यकीय अधिकां-यांनी येथे सेवा दिलेली आहे. असे असताना रुग्णालयात काही महिण्यापूर्वी फायर सिस्टिम व ड्रेनेज चे काम सुरू होते. कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका खाजगी ठेकेदाराकडून हे काम सुरू होते. त्यांनी हे काम अर्धवट सोडून दिले व यामुळे सध्या रुग्णालयातील व वार्डातील स्त्री, पुरुष शौचालये बंद झाली आहेत. सध्या यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण जमा झाली आहे. याची दुर्गंधी संपूर्ण रुग्णालय परिसरात पसरत आहे. याचा त्रास रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, तसेच उपचारासाठी येणाऱ्या पेंशट व त्यांच्या नातेवाईकांना होत आहे. बाथरूमला जायचे कोठे? महिला, मुली याची मोठी कुंचबना होत आहे. 

ड्रेनेज लाईन खोदल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, डासांचे, मच्छरांचे प्रमाण वाढले आहे, याच रुग्णालयातील एका नर्सला डेंग्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही अवस्था तर पेंशट व नातेवाईक यांचे काय?
या गैरसोयीबाबतीत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ. माधवी पंदारे यांनी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभाग, गोवेली ग्रामपंचायत यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, संबंधित ठेकेदाराला वांरवार फोन केले. पण फोन उचलले नाहीत, तसेच ग्रामपंचायतीने फवारणी देखील केली नाही. असे समजते.याहूनही आश्चर्य म्हणजे ठाणे जिल्हा हा हगणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. टप्पा क्रमांक २ (ओ डि, एफ) अंतर्गत सर्व शासकीय संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, आरोग्य विषयक संस्था, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय इत्यादींना पाण्याची व शौचालयची सुविधा पुरविणे आवश्यक असताना यासाठी केंद्र व राज्य शासन संपूर्ण स्वच्छताअभियानाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत असताना ग्रामीण रुग्णालय गोवेली मध्ये शौचालयाची दुरावस्था झाली आहे. याशिवाय पुढे शेड, पिण्याचे पाणी, आदी गैरसोयीचा सामना रुग्णांना करावा लागत आहे.

दुसरीकडे, तालुक्यातील वरीष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी,यांची केबिनमधील शौचालये व हँडवाँश, डेटाँल इत्यादी साहित्य सुस्थितीत दिसून येते. मात्र सामान्य जनता, गोरगरीब लोक, यांच्या साठी असलेल्या शौचालये, मुता-याची दयनीय अवस्था दिसून येते आहे. त्यामुळे हे सरकार अधिकारी, पुढारी, नेते, मंत्री, आमदार, यांच्या साठी गतिमान आहे का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी विचारला आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...