Wednesday, 9 August 2023

कल्याण पंचायत समितीमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा, तर मुरबाड मधील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत इर्शाळवाडीला करणार मदत !

कल्याण पंचायत समितीमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा, तर मुरबाड मधील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत इर्शाळवाडीला करणार मदत !

कल्याण,:(संजय कांबळे) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले तर मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायत कार्यालयात अंत्यत साध्या पध्दतीने आजच्या दिनी या क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात येवून या पैशातून खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेतील वाचलेल्या समाजबांधवांना मदत करण्यात येणार आहे. एकूणच जिल्ह्यात सर्वत्र जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आज जागतिक आदीवासी दिनाच्या निमित्ताने कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान बिरसा मुंडा, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे जल, जंगल चा ऊलगुलान तसेच आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच अन्य इतर आदिवासी क्रांतिकारकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अमुल्य योगदान या विषयी अमुल्य माहिती दिली. अनेक घटना ज्या लोकांना माहिती नाही याबद्दल सविस्तर वर्णनासह उपयुक्त माहिती उपस्थितीतांना दिली. यावेळी सुदाम महाडिक, उप अभियंता, नारायण गावीत, सहा लेखा अधिकारी, दिनेश घोलप, सुनील संत, विक्रम चव्हाण, हे विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तर मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या फांगुळगव्हाण ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगवान बिरसा मुंडा, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अंत्यत साध्या पध्दतीने अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. मात्र येथील संरपच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांनी अंत्यत चांगला निर्णय घेतला, तो म्हणजे मागील महिन्यात रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेत वाचलेल्या समाजबांधवांना मदत करण्याचा!याला सर्वानी सहमती दर्शवली, या अगोदर उपस्थितीत ग्रामस्थांनी मणिपूर घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सविता रवींद्र भला, राजू आंबो भला, उपसरपंच, सदस्य मनिषा किरण कारमळ, लक्ष्मी शंकर भला, तानाजी देऊ भला, दगडाबाई खाकर,विमल पोकळा, विठ्ठल भला, पांडुरंग साबळे, मंदा गणेश भला, यांच्या सह किरण कारभळ,प्रकाश खाकर, शंकर भला गणेश सांगडे, पांडुरंग तेलम इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. इर्शाळवाडी ग्रामस्थांना करीत असल्याचे मदतीचे व त्यांच्या या उपक्रमाचे मुरबाड तालुक्यातून कौतुक केलं जातं आहे.
दरम्यान आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत मधून भगवान बिरसा मुंडा व आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(फोटो)

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...