Wednesday, 9 August 2023

जिजाऊची कारकीर्द ___

जिजाऊची कारकीर्द ___

*आदिवासी नसतानाही पालघरमधील असंख्य आदिवासींचा उत्कर्षासाठी उभा राहिलाय एक शेतकऱ्याचा मुलगा*

पालघर : पालघर सारख्या दुर्गम आदिवासी भागांत निलेश सांबरे यांचा जन्म झाला. वाढत – घडत असताना  इथल्या गोर गरीब आदिवासी समाजातील माणसांच्या जगण्यातल्या रोजच्या समस्या, त्यांचा संघर्ष पाहून ही परिस्थिती बदलली पाहिजे याचा सातत्याने ते विचार करायचे. गुणवत्तेने आणि क्षमेतेने कुठेही कमी नसलेल्या आमच्या या जिल्ह्यातल्या लोकांना हालाखीचे जीवन का जगावे लागत आहे ? असे प्रश्न त्यांना पडायचे. मग निलेश सांबरे ज्यांना पालघर जिल्ह्यात आप्पा या नावाने ओळखले जाते त्यांनी विचार केला की समाजाला सक्षम करायचे असेल तर आधी स्वत:ला सक्षम केले पाहिजे. प्रचंड मेहनत आणि चिकाटीने आप्पांनी आधी स्वत:ला घडवले. उद्योग व्यवसायात स्थिर झाले. निलेश सांबरे यांनी गाठलेली उंची पाहून त्यांना समाधान वाटत होते. पण आपल्या समाजाचे काय ? आपल्याला जे मिळाले आहे त्यात समाजाचेही आपण देणे आहोत. या विचाराशी निलेश सांबरे हे प्रामाणिक राहिले. आभाळा एवढे मोठे व्हायचे आहे पण मातीशी ईमान राखून हे त्यांनी मनावर बिंबवून ठेवले समाजाप्रती असलेली तळमळ ही काही अप्पांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि मग त्यातूनच २००८ साली स्थापन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था....

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा आमचा पालघर जिल्हा अजूनही विकासापासुन कोसो दूर आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत आम्हाला अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि पाणी यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय यासारखे दूसरे दुर्दैव नाही. सरकारी अनास्थेचे, भ्रष्ट नोकरशाहीचे आणि राज्यकर्त्यांचे आपण बळी ठरलो आहोत असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. पालघर जिल्ह्यात दरवर्षी कुपोषणाने कोवळी पानगळ व्हावी तशी बालके मृत्यूमुखी पडताना आम्ही फक्त  मुकाट्याने फक्त आकडे मोजत बसावे हेच चित्र आपण बदलायचा ध्यास निलेश सांबरे यांनी घेतला आहे आणि त्यामाध्यमातून बदल घडताना दिसत आहे .ठाणे - पालघर जिल्ह्यातील तरुणाईला आणि नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सुविधा, उत्तम शिक्षण, रोजगार, क्रीड़ा या सुविधा मिळाव्यात यासाठी जिजाऊ रात्रंदिवस झोकून देऊन काम करत आहे. 

पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल भाग आहे परंतु इथल्या माणसांत जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनतीला तो कुठे ही कमी नाही, निसर्गाचे वरदान लाभलेला वैभवशाली असा हा जिल्हा मात्र असे असतानाही इथल्या सामान्य माणसांच्या जीवनात हे वैभव कुठेही पाह्यला मिळत नाही. विकासाची स्वप्न दाखवून इथल्या सिस्टीमने या जिल्ह्याला फक्त ओरबाडलेच आहे. इथला तरुण पोटापाण्यासाठी आपले गाव सोडून मुंबईसारख्या महानगरात मिळेल त्या परिस्थितीशी जुळवून घेतोय. शैक्षणिक पात्रता असूनही आयुष्यात पुढच्या स्पर्धेत नामशेष होतोय ? आरोग्य सुविधेबाबतही तीच तऱ्हा आणि म्हणूनच कोकणच्या सर्वांगीण विकासाचा आणि सर्व माणसांच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन निलेश भगवान सांबरे हे आपल्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या स्वकमाईतून गेली १५ वर्षे कार्य करत आहे. शैक्षणिक सामाजिक संस्था शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कोकणाच्या ५ जिल्ह्यांमध्ये संस्था दिवस-रात्र सक्रीय आहे. 

जिजाऊ  MPSC व UPSC अकॅडमी : 

सरकार दरबारी, शासकीय कार्यालयात आपले गाऱ्हाणे घेऊन गेल्यानंतर तासंतास ज्या आदीवासीना कार्यालयाच्या बाहेर ताटकळत ठेवले जायचे. त्याच आदिवासी समाजातून आज अधिकारी घडवले जात आहेत. जिजाऊ MPSC व UPSC अकॅडमी स्थापन करून आपल्या मातीतून चांगले अधिकारी घडावेत आणि त्यांनी इथल्या भागांचा कायापालट करावा हा व्यापक दृष्टीकोन ठेवून जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे समाजसेवेचा महायज्ञ चालवत आहेत. याचा लाभ घेऊन पालघरच्या जव्हार तालुक्यातील दमली येथील ललित चिंतामण मऊले हा विद्यार्थी ए.एस.ओ, एस.टी.आए, सहाय्यक कक्ष अधिकारी या परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आला आहे. तर विक्रमगड तालुक्यातील वेढे, भोपीवली येथील शैलेंद्र भवर हा विद्यार्थी महाराष्ट्र वन सेवा (आर.एफ.ओ) महाराष्ट्रात दुसरा आला . 

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर विक्रमगडमध्ये जिजाऊ संस्थेच्या स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा लाभ घेऊन शिकलेल्या स्वप्निल माने याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत उल्लेखनीय असे यश संपादन केले आहे. देशात त्याने ५७८ वा क्रमांक मिळवला आहे. त्याने सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. आतापर्यंत पोलीस ५००च्या वर विद्यार्थी हे पोलीस दलात नोकरीस लागले तर १००० हून अधिकजण हे शासाकीय सेवेत अधिकारी झाले आहेत. 

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात आदिवासी समाजातली मोहिनी भारमल हे अश्याच एका जिजाऊने बळ दिल्यानंतर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या जिद्दीचे एक उदाहरण आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पतीचे निधन झाल्यानंतर मोहिनी पूर्णपणे खचली होती. पोटातल्या बाळाची आणि आणि वृद्ध सासूची जबादारी असतना तिने अग्निशमन दलासाठी असणारी परीक्षा उतीर्ण होत या दलातील नोकरी मिळवली आहे. या कठिण काळात तिची आणि तिच्या कुटुंबाची अगदी पालकाप्रमाणे जबादारी घेतली ती जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी.

जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा :

समाजातील दिव्यांग बांधव ही देखील आपली जबादारी आहे आणि म्हणूनच जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा २०१६ साली स्थापन संस्थेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली. आज या ठिकाणी १०५ दिव्यांग मुले आहेत. त्यांच्यातील कलागुण आणि ज्ञान बघून भारावून जायला होते. अगदी युपीएस / एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षेपर्यंत त्यांना सक्षम करण्याचा ध्यास संस्थेने घेतला आहे. 

सी. बी. एस. ई स्कूल व कॉलेजची स्थापना

ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थांना शिक्षणाच्या सर्वोत्तम संधी उपलब्ध व्ह्याव्यात म्हणून आपण सौ. भावनादेवी भगवान सांबरे सी. बी. एस. ई स्कूल व कॉलेजची स्थापना केली आहे. एकूण ८ सी. बी. एस. ई स्कूल संस्थेच्या वतीने मोफत चालवल्या जात आहेत. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात मोखाडा येथे १ खोडाळा येथे १ ब्राम्हणपाडा येथे १ तर जव्हार तालुक्यात झाप येथे १, चाल्तवड येथे १, विक्रमगड येथे १ व ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील गोठेघर येथे १ व भिवंडीत अंबाडी येथे १ शाळा आहे. चांगल्या शिक्षकांची निवड करून आपण त्यांना भविष्यासाठी JEE / NEET अशा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात येत आहे. तर क्रीड़ा अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात उत्तमोत्तम क्रीडापटू व्हावाहेत इथल्या ग्रामीण भूमीतले खेळाडू घडावेत यासाठी जिजाऊ स्पोर्ट अकॅडमीही चालवली जाते. आज राष्ट्रीय पातळीवर आज हे क्रीडापटटू चांगली कामगिरी करत आहेत. मॅरॅथॉन सारख्या स्पर्धांचे आयोजण करून संस्था येथील स्थानिक खेळाडूंना सातत्याने प्रेरणा देत असते. तर आदिवासी खेड्यापाडयांसह अनेक गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे मोफत २५ लाख वह्यांचे वाटप केले जाते. 

श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय __

इथल्या आदिवासी समाजातील माणसांचा रोजच्या जगण्याचा संघर्षच इतका खडतर असतो की आरोग्य सुविधा मिळणे ही तर लांबचीच गोष्ट, आजही इथे रुग्णांना, गर्भवती मातांना झोळी करून शहरी भागांत रुग्णालयात न्यावे लागते. कित्येकदा वाटेतच रुग्ण दगावल्याचा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र जिजाऊने हे चित्र बदलण्यास सुरुवात केली आहे. विक्रमगड - जव्हारसारख्या भागात पहिल्यांदाच अद्ययावत असे श्री. भगवान महादेव सांबरे रुग्णालय  सुरु करून आपल्या माय- भगिनींना मोफत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अगदी सर्दी, खोकल्यासाठीही एम .डी डॉक्टर नियुक्त केले आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना देखील उपचारासाठी मदत मिळवून दिली जाते. डायलेसिस , प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया विभाग, बालरोगतज्ञ, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काणाच्या शस्त्रक्रिया यांसह विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात यांचीही सुविधा आहे. आरोग्य सुविधांअभावी आणि उपचारांअभावी एकही रुग्ण दगावू नये या वाचनाला आजही जिजाऊ संस्था जागत आहे. यासाठी ठाणे - पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात प्रतीवर्षी हजारोंच्या संख्येने मोफत आरोग्य शिबिरे घेतली जातात. या  शिबिरांमधून आतापर्यंत हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. तर आतापर्यंत हजारोंच्या संख्यने मोफत शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर गरजेच्या ठिकाणी मोफत रुग्णवाहिकाही संस्थेच्या वतीने पुरवण्यात येते. तर अनेक रुग्णांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी जिजाऊ हिरारीने पुढाकार घेते. जव्हार तालुक्यातील बेहेडपाडा येतील संदेश पिठोले या आदिवासी समाजातील मजुराचे काम करत असताना एका अपघात दोन्ही पाय गमावले यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी व्यक्तीश: मदत करत मुमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्मंत्री सहाय्यता निधीतून तत्काळ ५ लाख रुपयांची मदत मिळवून दिली. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत की जी आदिवासी समाजासाठी अगदी तळमळीने निलेश सांबरे यांनी केलेल्या मदतीची साक्ष आहेत. 

महिला सक्षमीकरण __ 

हिरकणीचा वारसा सांगणाऱ्या कोकणातील महिला हिंमतवान आणि मेहनती आहेत. अश्या मायभगिनींना सक्षम केले तर त्या स्वावलंबी होऊन खऱ्या अर्थाने इथल्या दुर्गम भागांचा विकास आणि सक्षमीकरणास उभारी देतील या हेतूने जिजाऊने  हजारो महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारप्रवण करणारे उपक्रम राबवत आहे.महिला सक्षमीकरण विभागांतर्गत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील आशा गृहोद्योगाच्या माध्यमातून लाखो महिलांना भेट देऊन हजारो महिलांना स्वयंरोजगारचे प्रशिक्षण, तसेच विभागांतर्गत  पीठगिरणी, शिलाई मशीन्स, पत्रावळी मशीन्स, कॅटरिंग सेट, हातगाड्या, उसाचे चरखे, गारमेंट फॅक्टरी, अगरबत्ती प्रशिक्षण, ब्राँच बनविण्याचे प्रशिक्षण, रिक्षा प्रशिक्षण, महिलांसाठी मेहेंदी, योगा, शिलाई मशीन, ब्युटी पार्लर, दागिने बनवण्याचे प्रशिक्षण, खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देऊन अनेक माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

शेती...

आमच्या शेतकरी बांधवाला बळीराजा असे संबोधले खर तर तो नावापुरतेच राजा उरला आहे अशी सध्या शेतीची परिस्थिती आहे. आणि म्हणूनच  निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातील शेती ही तोट्याची असू नये, ती जोडधंद्यांसह फायद्याचीच ठरावी यासाठी जिजाऊ सातत्याने नाविन्यपूर्ण  उपक्रम चालवत असते. त्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना पाच लाख फळरोपे वाटपा बरोबरच इतरही उपक्रम राबवले जातात. कोकणामध्ये पाऊस आहे, पण शेतीसाठी, पिण्यासाठी बारमाही पाणी नसते. त्यामुळे शेतीच्या सक्षमीकरणासाठी नद्यांना बंधारे बांधून बारमाही शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकणाजवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारखी कोट्यवधी ग्राहकांची महानगरं असूनही दुग्ध व्यवसाय म्हणावा तेवढा नाही. मानस आहे. कुकुटपालन, मत्स व्यवसाय, शेळीपालन , भाजीपाला शेती यांसारखे शेती जोडव्यवसाय चालू करून त्यास चालना देऊन सक्षम शेतकरी घडवण्याचा जिजाऊ संस्थेचा मानस आहे. 

रोजगार__

इथल्या अनेक सुक्षित तरुणांना प्रामाणिकपणे काम करायची इच्छा असूनही हाताला काम मिळत नाही. बेकायदेशीर कामांचे मार्ग त्यांना अधूनमधून खुणावतात यातून उद्याचे समाजाचे भविष्य घडवणाऱ्या भावी पिढीला वाम मार्गाची कीड लागू नये यासाठी प्रत्येक रिकाम्या हाताला काम मिळावे या हेतूने  कौशल्य विकासाचे उपक्रम राबवले जातात. त्यासाठी रोजगार साधने पुरवत खास प्रशिक्षणाचाही प्रयत्न असतो. वाडा येथे जिजाऊ व्यवसायिक प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्यात आली असून त्यामध्ये शेकडो  विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. १) मोटार मॅकेनिकल, २) इलेक्ट्रिशियन  3) नर्सिंग, ४) MSCIT & Tally. ठाणे शहरामध्ये कॉम्पुटर, ग्राफिक डिजायनिंग व डिजिटल मार्केटिंगचे मोफत प्रशिक्षण सुरु केले आहे.


भाऊबीज कृतज्ञतेची___

समाजात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या सुटाबुटात राहणाऱ्या अनेकांचा अनेकवेळा सन्मान केला जातो मात्र खऱ्या अर्थाने तळागाळात जाऊन काम करणारे असंख्य हात आपल्या  समाजासाठी अहोरात्र झटत असतात म्हणूनच आपला समाज निकोप, सुरक्षितपणे श्वास घेत असतो. याचीच जाणीव ठेवून सन २०२० पासून दोन्ही जिल्हयातील आशा वर्कर्स, आरोग्य सेविका आणि महिला पोलिस भगिनी ज्यांनी कोरोनाकाळात जिवाची बाजी लावून कार्य केले अशा १० हजार भगिनींना पैठणींची भेट देऊन संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी कृतज्ञतेची भाऊबीज साजरी करण्यात येते. माझ्या एकाही बहिणीला कुठल्याही अडचणीसाठी सोने -नाणे गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही हा विश्वास निलेश सांबरे आपल्या या बहिणींना देतात. 

आदिवासी प्रकल्प ग्रस्तांना उपोषण करून दिला न्याय 
विक्रमगड/तलवाडा जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासी, दुर्गम व डोंगराळ असून येथे गेल्या ४५ वर्षांपासून आदिवासी उपाययोजनेतून अनेक धरणे बांधण्यात आली. मात्र, आजही आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. या प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. याबाबत वारंवार तगादा लावून, बैठका घेऊन, आंदोलने करून गरीब आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाशी मंत्रालयात बैठक घेऊन एका महिन्यात प्रश्न मार्गी लावण्याचे यावेळी आश्वासन दिले. यातील अनेक प्रश्न आता मार्गी लागत आहेत. गरीब आदिवासी वंचितांना न्याय देण्यासाठी निलेश सांबरे हे आजही लढत आहेत आणि यापुढेही लढत राहतील.

जून २०२३ मध्ये झालेल्या वादळी वार्‍यामुळे भिवंडी तालुक्यातील पडघा विभागातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. यात अनेक घरांचे पत्रे उडाले तर अनेक घरांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली होती. यात पत्रे उडालेल्या अनेक घरांना जिजाऊकडून पत्रे वाटप करण्यात आले होते. याच पडझडीत पडघा विभगातील वाफाले गावातील आदिवासी समाजातील ८४ वर्षीय वृद्ध गृहस्थ सरावण्या पवार यांचे राहते घर हे देखील या वादळी वार्‍यात पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. याबाबतची माहिती जिजाऊ शैक्षणिक आणि समाजिक संस्थेला समजताच निलेश सांबरे यांनी या ठिकाणी भेट दिली व वयोवृद्ध असलेल्या सरावण्या पवार यांना शब्द दिला की १५ दिवसांतच आपण तुमचे घर पुन्हा नव्याने बांधून देऊ. दिलेला शब्द पाळत निलेश सांबरे यांनी  बांधून पूर्ण झालेले हे घर वृद्ध गृहस्थ सरावण्या पवार यांना सुपूर्द केले आहे. 

या वेळी या गावातील ग्रामस्थांसह तालुक्यातील अनेक गावांनी जिजाऊच्या या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे. तर यावेळी आपले कोलमडलेले घर पुन्हा छान पद्धतीने बांधून उभे राहिल्याचे पाहून वृद्ध सरावण्या पवार यांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाने ओलावल्या होत्या. तर या आजोबांची पुढील उदर निर्वाहासाठी जिजाऊ संस्था त्यांच्या सोबत असेल अशा विश्वासही निलेश सांबरे यांनी सरावण्या आजोबांना देत त्यांच्या जगण्याची जिद्द वाढवली आहे. 

आज जिजाऊ संस्थेतील सुविधांचा लाभ घेऊन जिजाऊच्या MPSC व UPSC अकॅडमीतून घडणारे अधिकारी पाहताना जिजाऊच्या स्थापनेचा उद्देश सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. तर भंगार वेचता वेचता आपले भविष्य हरवून गेलेल्या कोणाला भाकरीचा रस्ता मिळवून द्यावा. पैशांअभावी हतबल होवून जीवनाच्या शेवटाची वाट बघणाऱ्या रुग्णाला जगण्याची उमेद द्यावी, कोण्या अंधारलेल्या डोळ्यांना प्रकाशमय तेजोमय वाट दाखवावी, हिंमतीने उभे राहून आकाश कवेत घेण्यासाठी धडपडणाऱ्या युवकांना जिद्दीचे पंख द्यावेत या विचारांवर जिजाऊ संस्थेची श्रद्धा आहे आणि हेच विचार घेऊन जिजाऊ नावाचा प्रचंड शक्तिशाली मंत्र आम्हांला सदैव प्रेरित करत असल्याचे जिजाऊ परिवारातील प्रत्येक माणूस सांगतो. 
समाजात परिवर्तन करण्याचा ध्यास घेतल्यानंतर हळू हळू जिजाऊने पावले उचलण्यास सुरुवात केली. समोर समस्यांचा डोंगर मोठा होता. पण निर्धार पक्का असल्याने काही झाले तरी लढायचं भिडायचं ही प्रचंड ऊर्जा जिजाऊ या तीन अक्षरांनी जिजाऊच्या प्रत्येक सदस्यांत पेरली प्रत्येक तळागाळात कार्यकर्ता झपाटल्यासारखा दिलेली प्रत्येक जबाबदारी एखाद्या मोहिमेसारखी पार पाडत होता... आताही पार पाडतोय आणि म्हणूनच जिजाऊ नावाने लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचे आज आधारवडात रुपांतर  झालय... माणूस म्हणून अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा आमचा हक्क आम्हाला अबाधित ठेवायचा आहे. त्यामुळे आपली लढाई कुणा एका व्यक्तीविरोधात किंवा यंत्रणेविरोधात नाही. भ्रष्टाचार, अनीति, बेबंदशाही, कामचुकारपणा, विनाशकारी विचार यांसारखे राक्षस आपल्या मारावे लागतील. उच्च नीच, गरीब ही भेदभावाची दरी आपल्याला संपवावी लागेल.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...