ठाणे व पालघर जिल्ह्यात ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन !!
ठाणे, दि.०८ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार , ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, शाळा न्यायाधीकरण व इतर न्यायालयांमध्ये शनिवार, दि. ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता "राष्ट्रीय लोकअदालत'" चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणे जी दिवाणी स्वरूपाची तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची १३८ एन.आय. अॅक्ट (चेक संबंधीची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
तरी सर्व पक्षकारांनी आपण या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे किंवा संबंधीत तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा. तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा फोन नंबर ०२२-२५४७६४४१, व्दारे संपर्क साधावा. सर्व पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता व आपले दुरावलेले संबंध पुर्नस्थापीत करणेसाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री व सचिव ईश्वर का सुर्यवंशी यांनी केले आहे..
No comments:
Post a Comment