Tuesday, 5 September 2023

मोहने यादव नगर येथील न्यू रिलॅक्स गॅस एजन्सी कडून ग्राहकांची फसवणूक !!

मोहने यादव नगर येथील न्यू रिलॅक्स गॅस एजन्सी कडून ग्राहकांची फसवणूक !!

*मोदी सरकारने घोषणा केलेली रक्षाबंधनची भेट न मिळाल्याने शेकडो गृहणी संतप्त*

कल्याण, प्रतिनिधी : मोहने आंबिवली येथील न्यू रिलॅक्स गॅस एजन्सी कडून शेकडो ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
        मोदी सरकारने मोठा गाजावाजा करून २९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन निमित्त भारतातील कोट्यावधी गृहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून मध्यरात्रीपासून घरगुती गॅसच्या दरात दोनशे रुपयांची भरघोस सूट घोषित केली होती. अनेक मंत्री व भाजपचे कार्यकर्ते या भेटीचे कौतुक करीत होते. परंतू आंबिवली यादव नगर येथील 'न्यू रिलॅक्स गॅस एजन्सी'ने गृहिणींना मात्र ही भेट नाकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 
       30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी शेकडो ग्राहकांनी व महिलांनी या एजन्सी कडून गॅस सिलेंडर खरेदी केले मात्र त्यांना एजन्सीने दरात सूट दिली नसल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले.
       न्यू रिलॅक्स एजन्सी कडून ग्राहकांना हाताने बनविलेले ११०३ रुपयाचे बिल देण्यात आले. तुम्हाला दोनशे रुपये अतिरिक्त द्यावेच द्यावेच लागतील तरच तुम्हाला सिलेंडर मिळेल अन्यथा सिलेंडर मिळणार नाही असे सांगितले.
धम्मदीप नगर येथील रहिवासी सुंदर वीर यांची अशीच फसवणूक झाली असून त्यांच्याकडून अतिरिक्त घेतलेले दोनशे रुपये देण्यास एजन्सीने नकार दिला आहे.
    "रक्षाबंधन सण असल्याने दोनशे रुपये" अतिरिक्त देऊन ग्राहकांना नाईलाजास्तव सिलेंडर खरेदी करावे लागले. 

        मात्र एचपी गॅस कंपनीकडून ग्राहकांना मोबाईलवर 903 रुपये बिल निघाले असल्याचा मेसेज आला. तात्काळ ग्राहकांनी एजन्सीकडे धाव घेतली आणि आम्हाला 903 रुपये बिल जनरेट झाला असल्याचे त्यांना दाखविले तसेच आमच्याकडून अतिरिक्त घेतलेले दोनशे रुपये पर्यंत द्या असे सांगितले परंतु गॅस एजन्सीने दोनशे रुपये परत देण्यास नकार दिला. नवीन दर हे १ सप्टेंबर पासून लागू आहेत त्यानंतरच तुम्हाला सूट मिळेल आत्ता तुम्हाला पैसे परत देता येणार नाही असे सांगितले.
        याबाबत दूरध्वनी द्वारे एजन्सीला संपर्क केला असता येथील महीला कर्मचाऱ्यांने वरिष्ठांशी बोलून अधिक माहिती देते दर कधी लागू झाले आहेत हे मला माहीत नाहीत माहिती घेऊन फोन करते असे सांगितले. 
        सुंदर वीर हे एजन्सी विरोधात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन नवी मुंबई येथे तक्रार करणार आहेत तसेच न्याय न मिळाल्यास ग्राहक संरक्षण मंच व ग्राहक न्यायालयाकडेही दाद मागणार असल्याचे सुंदर वीर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...