Monday, 4 September 2023

अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकसंदर्भात *व्हॉट्सॲप क्रमांकावर* तक्रार करण्याचे आवाहन !!

अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूकसंदर्भात *व्हॉट्सॲप क्रमांकावर* तक्रार करण्याचे आवाहन !!
 
ठाणे, प्रतिनिधी :- ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत कार्यरत असलेले रेतीगट दक्षता पथक क्र. ०१ व ०२ यांचे मार्फत नागरीकांसाठी अवैध गौणखनिज उत्खनन / वाहतूकीबाबत तक्रारी करण्यासाठी दोन व्हॉटसअप हेल्पलाईन क्रमांक कार्यरत करण्यात आले आहे.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होतांना आढळल्यास नागरिकांनी या व्हॉटसअप क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांनी केले आहे.

            अवैध गौण खनिज उत्खननन व वाहतुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी व्हॉटसअप क्रमांक - श्री. संजय बा. जाधव (दक्षता पथक क्र. ०१) :- ९३२४९७८०२०, श्री. सचिन बु. भोईर (दक्षता पथक क्र. ०२) :- ७०३०६७३६८८.

            नागरीकांनी अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक होतांना आढळून आल्यास वरील क्रमांकावर माहिती पाठवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...