Friday, 8 September 2023

कल्याण पश्चिम येथे दही काला उत्सव जोरात संपन्न !!

कल्याण पश्चिम येथे दही काला उत्सव जोरात संपन्न !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिम येथे विविध राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. त्या फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हंडी फोडण्यासाठी गोविदा पथकांनी थरावर थर रचले. सतत कोसळणाऱ्या पावसामध्ये दहीहंडी उत्सवात तरुणामध्ये जल्लोष बघल्याला मिळाला.

कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात शिंदे गटाने दहीहंडी उभारली होती. तर हाकेच्या अंतरावर ठाकरे गटाने एकनिष्ठतेची दहिहंडी उभारली होती. शिंदे गटाच्या दहिहंडीला शहर प्रमुख रवि पाटील, सुनील वायले आदी पदाधिकारी उपस्थित होते. सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाना त्यांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली. तर ठाकरे गटाच्या दहिहंडीच्या ठिकाणी शिवसेना नेते बाळ हरदास आणि शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह रविंद्र कपोते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सहजानंद चौकात भाजपच्या वतीने शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या पुढाकाराने इंडिया आघाडीची प्रतिकात्मक दहिहंडी उभारण्यात आली होती. यावेळी या उत्सवात केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, मा. आमदार नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...