महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेत कल्याण डोंबिवली येथील खेळांडूची चमकदार कामगिरी !!
कल्याण, (संजय कांबळे) :
श्री शिव छत्रपति स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, येथे नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर अजिंक्यपद कराटे स्पर्धा 2023, मध्ये सब ज्युनियर अंडर 9 मध्ये, मुलाच्या श्रेणी मध्ये खुश चौधरी हिने सुवर्ण पदक (गोल्ड मेडेल) पटकावले आहे. तसेच व अंडर 11 मध्ये +45, मुलाच्या श्रेणी मधे अथर्व चौधरी ह्यने कांस्य पदक (ब्रॉंझ मेडेल) व अंडर 6 मध्ये श्लोक लोकरे याने कांस्य पदक (ब्रॉंज मेडेल) पटकावले आहे. तसाच अंडर 12 गट -35 मधे पारमिता काम्बले हिने कांस्य पदक पटकवले आहे,कल्याण डोंबिवली येथील या खेळाडूच्या यशाबद्दल या सर्वांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,
लहान पणापासून ह्यांना कराटे ची आवड असल्याने कल्याण डोंबिवली कराटे एसोसिएशन आँफ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली 'सेसेई विवेक शुक्ला' हे कल्याण मधील योगीधाम येथे या खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. नुकतीच पुणे बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स काँम्प्लेक्स येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर अजिंक्यपद कराटे स्पर्धा२०२३ मध्ये या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली.
यांचा मेडल सत्कार समारंभ कराटे दो एसोसिएशन ऑफ महाराष्ट्रा चे प्रेसिडेंट सलाउद्दीन अंसारी व जनरल सेक्रेटरी संदीप गाडे आणि कोषाध्यक्ष संदीप वाघचौरे यांनी केला.
कल्याण, डोंबिवली कराटे एसोसिएशन च्या मार्गदर्शना खाली हे सर्व खेळत आहेत.
ही सर्व मुले मार्शल आर्ट्स शोतोकन कराटे एसोसिएशन, कराटे क्लास मध्ये शिकतात. यांचे शिक्षक 'सेंसेई विवेक शुक्ला' हे आहेत. हे 14 वर्षा पासून कराटे करत आहेत. हे त्यांचा कराटे क्लास कल्याण पश्चिम येथील योगिधाम मध्ये चालवतात.
सेंसेई विवेक शुक्ला यांनी असे सांगितले कि ते कल्याण डोंबिवली कराटे असोसिएशन ला असेच चांगले विद्यार्थी देऊन कल्याण डोंबिवली चे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment