म्हारळ, वरप, कांबा विभाग मंडळ अध्यक्षाकडून विविध कामाची सुरुवात !
कल्याण, (संजय कांबळे) : गेली अनेक वर्षे म्हारळ, वरप, कांबा या परिसरात विविध लोकोपयोगी, समाज उपयोगी कामे करणाऱ्या समाजसेवक महेश चिंतामण देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी व उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांनी त्यांची नियुक्ती या विभागाचे मंडल अध्यक्ष म्हणून केली, नियुक्ती होताच त्यांनी विविध प्रकारच्या लोकोपयोगी कामांचा धडाका सुरू केला आहे,
म्हारळ सोसायटी येथे राहणार्या महेश देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी म्हारळ ग्रामपंचायत मधील मुद्रांक घोटाळा बाहेर काढला होता, तेव्हा पासून ते या परिसरात प्रसिद्धीच्या झोतात आले, सध्या त्यांची पत्नी अमृता देशमुख या म्हारळ ग्रामपंचायतीच्या सदस्यां आहेत, तर महेश देशमुख हे समाजसेवक म्हणून परिसरात परिचित आहेत, कल्याण मुरबाड मार्ग, खड्डे, पोलिस चोकी, अंतर्गत रस्ते, गटारे, कचरा आदी विविध विषयांवर त्यांनी पत्रव्यवहार, मोर्चा, उपोषण, अशी आंदोलन केली असून यामुळे ते परिसरात चांगल्या प्रकारे ओळखले जातात, अनेक शिबिरे, दाखले वाटप, रेशनकार्ड, आधारकार्ड, पँनकार्ड असे उपक्रम राबविले आहे.
आता त्यांची म्हारळ, वरप, कांबा या विभागाचे मंडल अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे, नियुक्ती होताच स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान कार्ड काढून देण्याचे शिबीर आयोजित केले आहे, यावेळी म्हारळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश देशमुख, सदस्या अमृता देशमुख, माझी सरपंच प्रमोद देशमुख, मंडल अध्यक्ष महेश देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी गर्दी केली होती.
No comments:
Post a Comment