ट्रॅफिक वॉर्डनच्या मासिक मानधनामध्ये वाढ होऊन, विमा संरक्षण देण्याची ॲड.जितेंद्र जोशी यांची मागणी !!
कल्याण, अजय शेलार :
कल्याण डोंबिवली महानगरपालीकेच्या अंतर्गत येणा-या विभागात रोजच्या रोज वाहतुकीची समस्या वाढत असून, वाहतुक कोंडी, होणारे अपघात, वाहतुकीचे नियमन, रस्त्यांची दुरावस्था, अनियमीत खड्डेमय रस्ते, वाहतुकीच्या निवा-याचा अभाव, धुर, धुळ, हवा यांच्यामार्फत होणारे वायु प्रदुषण, वाहन-वाहक हयांच्यावर करावी लागणारी कारवाई, यांसारख्या कामांसाठी वाहतूक विभागाकडून पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेले असते. मात्र संख्याबळ कमी असल्या कारणास्तव त्यांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी ट्रफिक वॉर्डनची देखील नियुक्ती केलेली असते. मात्र त्यांना मिळणारे मानधन हे अत्यल्प आहे. या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत त्यांना मानधन वाढीसह विमा संरक्षण देण्याची ॲड. जितेंद्र जोशी यांनी एका महापलिका आयुक्त, पोलीस विभाग यांसह विविध सबंधित विभागांना निवेदन दिले आहे.
विभागातील अपुरे संख्याबळ, शारीरीक सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन असणा-या असुविधा, प्राथमिक वैद्यकीय सुविधांचा अभाव, त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार, उपद्रवी व्यक्तींकडुन होणारे शारीरी हमले, अपुरे संख्याबळ, कामांच्या तासांचा अनियमीतपणा, सण-समारंभ इत्यादीवेळेस वाहतुकीवर वाढणारा ताण, अश्या सर्व अडचणींना सामोरे जात वाहतुक नियमन करण्याबाबत वाहतुक पोलीसांवर दिवसोंदिवस ताण वाढत चालला आहे. त्याकरीता वाहतुकीचे नियमन करण्यासाठी व सहाय्यकाची भुमिका बजावण्यासाठी वाहतुक विभागास ट्रफिक वॉर्डनची गरज भासत असते.
वाहतुक विभागाच्या आवश्यकतेनुसार महापालीकेमार्फत ट्रफिक वॉर्डन पुरवले जातात. वाहतुक पोलीसांबरोबर काम करतांना त्यांना सहाय्य करतांना ट्रफिक वॉर्डन यांनाही वाहतूक पोलिसांच्याच समस्यांना रोजच्या रोज तोंड द्यावे लागते. मात्र असे असतानाही ट्रॅफिक वॉर्डन हयांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर मात्र कुठलीच ठोस उपायोजना करण्यात आलेली नाही. त्यांच्या शारीरीक समस्यांबाबत कोणत्याही प्रकारचा आरोग्य विम्याचे कवच त्यांना नाही. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालीका क्षेत्रातील ट्रॅफिक वॉर्डन हयांना मासिक ६०००/- रूपये इतके अत्यल्प मानधन आहे. नाईलाजास्तव आणि वाढलेल्या बेरोजगारीच्या कारणे ट्रॅफिक वॉर्डन हयांना आहे त्या तुटपुंज्या मानधनावर काम करणे भाग पडत आहे. याबाबीकडे ॲड. जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या निवेदनातून लक्ष वेधले आहे .
आजच्या महागाईच्या युगात वैयक्तीक खर्चाच्या व किमान वेतनाच्या दृष्टीकोनातुन सदरचे मानधन अत्यल्प आहे. तसेच काही महानगरपालीका, नगरपालीका क्षेत्रात ट्रैफिक वॉर्डन हयांना दिले जाणारे मानधन कल्याण डोंबिवली महानगरपालीकेपेक्षा निश्चीतच जास्त आहे म्हणूनच केडीएमसी क्षेत्रातील ट्रैफिक वॉर्डन यांना देखील किमान मासिक मानधन १२०००/- रूपये इतके होणे गरजेचे आहे.
तसेच काही वाहतुक विभागाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन मंजुर होवुनही अपु-या मानधनाअभावी तसेच संरक्षणाची कोणतीच हमी नसल्याने ट्रफिक वॉर्डन मिळणे कठीण होत असून विलंब लागत आहे. सहाजीकच ट्रॅफिक वॉर्डन अभावी वाहतुक नियमन व विवीध प्रकारच्या कामांचा ताण वाहतुक पोलीसांवर दिवसोंदिवस येत आहे. त्यामुळे निवेदनातील बाबींचा सहानुभुतिपुर्वक आणि गांभिर्याने विचार करून ट्रॅफिक वॉर्डन हयांचे मासिक मानधन किमान १२,०००/- रूपयांपर्यंत वाढवण्याची तरतुद करून, विमा संरक्षण पुवण्याचे आदेश व्हावेत ही विनंती. अशी मागणी अशी मागणी ॲड. जितेंद्र जोशी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment