Wednesday, 11 October 2023

क्रेडिट डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे भासवून ४८ हजार लंपास !!

क्रेडिट डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे भासवून ४८ हजार लंपास !!


ठाणे, प्रतिनिधी : बँकेतून बोलत असल्याचे भासवून एका महिलेने कळंबोलीत राहणाऱ्या तरुणीच्या क्रेडिट कार्डमधून ४८ हजारांची रक्कम परस्पर काढून घेतली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक झालेली २२ वर्षीय तरुणी एका खासगी कंपनीत कामाला आहे. महिनाभरापूर्वी एका महिलेने खासगी बँकेच्या क्रेडिट डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे भासवून तरुणीशी संपर्क साधला होता. यावेळी क्रेडिट कार्डला प्रोटेक्शन चार्ज लागला असून तो रद्द करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल, असे सांगितले होते. त्यानुसार पीडित तरुणीने आपले नाव, गाव व बँक खात्याची संपूर्ण माहिती भरल्यानंतर काही वेळातच तरुणीच्या क्रेडिट कर्डमधून ४८,६२३ इतकी रक्कम वजा झाली होती. याबाबत तरुणीने संबंधित महिलेशी पुन्हा संपर्क साधला होता. मात्र, त्या महिलेने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर क्राईम पोलिस ठाणे, कळंबोली पोलिस ठाणे तसेच बँकेत याबाबतची तक्रार दाखल केली आहे.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...