पिंपरी चिंचवड पुणे येथे कल्याण डोंबिवलीतील मुलींचा डंका, सिल्व्हर मेडेल ची कमाई !
कल्याण, (संजय कांबळे) : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्केटिंग हाँल येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कैडेट आणि ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेत कल्याण डोंबिवली मधील शनाया आर्या हिने सिल्व्हर मेडेल पटकावले आहे, त्यामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुणे जिल्ह्यातील पिपंरी चिचंवड शहरातील स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्केटिंग हाँल मध्ये महाराष्ट्र राज्य कैडेट आणि ज्युनिअर कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सब ज्युनियर अंडर 14 वर्ष श्रेणी -45 मध्ये , मूलीच्या श्रेणी मध्ये शनाया आर्या हिने रजत पदक (सिल्वर मेडेल) पटकावले आहे.
ह्यांच्या या यशाबद्दल तिचे सर्वाकडून अभिनंदन होत आहे, शनाया हिला लहानपणापासून कराटे ची आवड होती, जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट, करण्याची तिची तयारी दिसून येत होती. तिचे प्रशिक्षक सेसेई विवेक शुक्ला यांनी तिचे हे गुण ओळखून तिची तयारी करून घेतली. त्याचे फळ म्हणून आज तिथे पिंपरी चिंचवड येथे झालेल्या स्पर्धेत सिल्व्हर मेडेल ची कमाई केली.
यांचा मेडल सत्कार समारंभ कराटे दो एसोसिएशन ऑफ महाराष्ट्रा चे प्रेसिडेंट सलाउद्दीन अंसारी व जनरल सेक्रेटरी संदीप गाड़े आणि कोषाध्यक्ष संदीप वाघचौरे, यांच्या हस्ते करण्यात आला.
कल्याण, डोंबिवली कराटे एसोसिएशन च्या मार्गदर्शना खाली शनाया आर्या ही खेळत आहत, ही सर्व मुले मार्शल आर्ट्स शोतोकन कराटे एसोसिएशन, कराटे क्लास मध्ये शिकतात
यांचे शिक्षक सेंसेई विवेक शुक्ला हे आहेत. हे 14 वर्षा पासून कराटे प्रशिक्षण देत आहेत, शिवाय ते स्वतः ही कार्यरत आहेत.
मुलांना कराटे प्रशिक्षण देण्याचे काम कल्याण पश्चिम येथील योगिधाम मध्ये करत आहेत.याबाबत सेसेई विवेक शुक्ला यांना विचारले असता ते म्हणाले __ की ते कल्याण डोंबिवली कराटे एसोसिएशना ला असेच चांगले विद्यार्थी देऊन कल्याण डोंबिवलीचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
No comments:
Post a Comment