Wednesday, 18 October 2023

युवा कट्टा आणि शिवसेना युवासेना शाखा क्रमांक ५० च्यामुळे दालमिया महाविद्यालयच्या विद्यार्थीवर्गाला न्याय !!

युवा कट्टा आणि शिवसेना युवासेना शाखा क्रमांक ५० च्यामुळे दालमिया महाविद्यालयच्या विद्यार्थीवर्गाला न्याय !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :

             युवा कट्टा आणि शिवसेना युवासेना शाखा क्रमांक ५० च्या समवेत दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी मयुरेष कृष्णा बडद यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना शाखा क्र.५० चे शाखा प्रमुख मोहितेश नवघरे श्रीकांत बडद - कार्यालय प्रमुख आणि विजय सकपाळ शाखा समन्वयक आणि तन्वी नवघरे यांच्या उपस्थितीत दालमिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न्याय मिळाला.
             महविद्यलयाची फीस न भरल्यामुळे विद्यार्थाचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. याची तक्रार शिवसेना शाखा क्रमांक ५० मध्ये पालकांनी केली असता त्याची तात्काळ दाखल घेत उत्तर म्हणून या तक्रारीचे निवारण करण्यात आले.सविस्तर माहिती घेत विचारविनिमय करून संबंधित  विद्यार्थांना फिस भरण्यात सवलत उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय जप्त करण्यात आलेले त्यांचे मोबाईल त्यांना पुन्हा सुपूर्द करण्यात आले.या मोबाईल जप्त कारवाई मध्ये ४५ विद्यार्थांचा समावेश होता. विद्यार्थी वर्गाला आपापले मोबाईल परत मिळवून दिल्याबद्दल आणि विद्यार्थांना फिस भरण्यात सवलत उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी वर्ग यांनी युवा कट्टा आणि शिवसेना युवासेना शाखा क्रमांक ५० चे संबंधित पदाधिकारी, सदस्य आणि सभासद यांचे आभार मानले. तसेच मुख्याध्यापकांनी ग्वाही दिली की, पुन्हा अशी चूक होणार नाही.युवा कट्टा आणि शिवसेना युवासेना शाखा क्रमांक ५० च्यामुळे दालमिया महाविद्यालयच्या विद्यार्थीवर्गाला न्याय मिळाला या कार्यामुळे विभागात त्यांचे कौतुक होत असून अनेकांनी त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...