कल्याण शहर, ग्रामीण येथील ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा !!
कल्याण , नारायण सुरोशी : कल्याण तालुका/ कल्याण शहरातील ओबीसी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी, मागण्यांसाठी कल्याणतील बिर्ला कॉलेज ते प्रांत ऑफिस वायलेनगर येथे मंगळवारी भव्य मोर्चा काढला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. पण ओबीसी आरक्षणला धक्का लावू नये, ओ.बी.सी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर केले आहे, त्यात ओबीसी महिलांना एकूण ५० टक्के आरक्षण राखीव करण्यात यावे, राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी ७२ वसतीगृह सुरु करण्याचे जाहीर केले होते, ती सुरु करण्यात यावी. अशा विविध मागण्या घेऊन आज ओ.बी.सी. महासंघ कल्याण तालुका व कल्याण शहर परिसरातील ओबीसी नेते व कार्यकर्त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात पुरुष वर्गासह, तरुणाई, महिला वर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मोर्चाचे स्वरूप पाहता सरकार लवकरच निर्णय घेईल अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते परशुराम पिंताबरे, मा. आमदार नरेंद्र पवार, विश्वनाथ जाधव, राजाभाऊ पातकर, अरुण पाटील, प्रकाश भांगरथ, सुनिल वायले, साईनाथ तारे, भाऊ गोंधळे, नरेश सुरोशी, रविंद्र टेंबे, रविंद्र घोडविंदे, संदेश भोईर, रमेश बांगर, चंद्रकांत गायकर, महिला कार्यकर्त्या जयश्री सासे, निर्मला कदम, सोमनाथ मिरकुटे, जयराम मेहर, उत्तम शिरोसे, जयेश शेलार, अनंता (बंधू) जाधव, संतोष शिंगोळे, संजय शेलार, यांच्यासह अनेक महिला, युवा वर्ग आणि ओबीसी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment