भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्षपदी वैभव गणपत गायकवाड यांची नियुक्ती !!
कल्याण, सचिन बुटाला : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी भारतीय जनता युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्षपदी कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गणपत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉल येथे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील माजी मंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटीलजी, आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई चौधरी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, भाजपा कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील, भाजपा टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर आदी भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रंसगी उपस्थित होते.
वैभव गायकवाड हे स्थानिक भुमिपुत्र असल्याने लोकल टच् आणि सामाजिक बांधलकी, स्थानिक तळागळातील सर्व सामान्य पर्यंत त्यांचा संपर्क आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ, कार्यकुशलता, व्यापक युवा संपर्क याच्या जोरावर युवा मोर्चा माध्यमातून युवा वर्गाचे प्रश्न मार्गी लावतील असे चित्र पदनियुक्ती नंतर जमलेल्या युवावर्गाने केलेल्या जल्लोषामध्ये पाहताना दिसत आहे.
वैभव गायकवाड यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानले व भविष्यात पक्षानी दिलेले काम संपूर्ण ताकदीने करण्याची ग्वाही दिली.
No comments:
Post a Comment