Friday, 13 October 2023

शिवडी पोलीस ठाणे मुंबई दाखल गुन्हे शाखे तर्फे गुन्हे तपासात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान !!

शिवडी पोलीस ठाणे मुंबई दाखल गुन्हे शाखे  तर्फे गुन्हे तपासात उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान !!

मुंबई - निलेश कोकमकर 
         मुंबईत गुन्हेगारी प्रमाण वाढतच आहे आणि त्याचा सर्व हार मुळातच मुंबई पोलीस, मुंबई शहरातील गुन्हे अन्वेषण, शोध, तपासणीचे प्रभारीआणि दाखल गुन्हे शाखा यांच्यावर येत असतो. दिवसाला अगणित खटले पोलिसांकडे येत असतात आणि  मुंबई पोलीस बऱ्याच खटल्यांचा निकाल लावण्यात अग्रेसर आहे. 
          त्याच प्रमाणे माहितीनुसार शिवडी पोलीस ठाणे येथे दाखल गु. र. क्र. १६६ / २०२३ कलम ३७९, ४११, ३४ भा.दं.वि.सं मध्ये  शिवडी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास करून गुप्तबातामीच्या आधारे नमूद गुन्ह्यात ०३ आरोपींना अटक करण्यात आले. त्यांच्या कडून वेगवेगळ्या कंपनीचे ५ टॅब, २८० मोबाईल, एक स्कुटर अशी एकूण ९,४९,०००/- रुपये किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली. 
         यामध्ये मोलाची कामगिरी करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळूराव घागरे, पो.उप. निरीक्षक अविनाश मोरे, पो.ह. भालचंद्र आर गायकवाड, पो.ह. हर्षल देशमुख, पो.शि. संदीप साळेकर, पो.शि. कमरूलहक शेख, पो.शि.आप्पानंद जमादार, पो.शि. दिपक  माळोदे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जनसामान्यात बृहन्मुंबई पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. त्याबद्दल पोलीस आयुक्त बृहन्मुंबई विवेक फणसळकर साहेब, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई ) सत्य नारायण साहेब  यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रिवार्ड देऊन सन्मान करण्यात आला आणि पुढे अशाच प्रकारे उत्तम कामगिरी होत राहील अशी अशा व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...