Wednesday, 18 October 2023

पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी घेणार व निष्ठेने काम करणार - भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड

पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी घेणार व निष्ठेने काम करणार - भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड 


कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड यांची नुकतीच भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सामाजिक कामात मी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. समाजात मला अपेक्षित काही बदल घडविण्यासाठी सत्तेत असणे आवश्यक असते. या साठी मी राजकारणात प्रवेश केला, माझे आदर्श मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत हे यावेळी आवर्जून सांगितले.

त्यांना पत्रकारांनी बेरोजगारी विषयी विचारले असता, परिसरातील कंपनी मालक आणि कामगार संघटना यांच्याशी बोलून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील, तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता दूर करण्यासाठी व्यसनमुक्तीचे शिबिर आयोजित करणे, त्यांना शासनाच्या विविध योजनांतून स्वयं रोजगाराकडे वळविणे, तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा होत असलेला विकास आज अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनरबाजी मुळे बकाल होत आहे, त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार. सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातील प्रत्येक घटकाला त्यांचा कसा फायदा होईल या करता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

आमच्या पक्षाने मला संधी दिल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पक्षातील वरिष्ठ यांचे आभार व्यक्त केले व पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी ती मी घेणार असे सांगितले.





No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...