Monday 30 October 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‌ यांनी केली पलावा (डोंबिवली) वासियांची दिवाळी गोड !!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‌ यांनी केली पलावा (डोंबिवली) वासियांची दिवाळी गोड !!

*मालमत्ता करात ६६ टक्के सूट*


डोंबिवली, सचिन बुटाला‌‌ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‌ यांनी डोंबिवलीच्या पलावातील रहिवाशांना दिवाळी भेट दिली आहे. डोंबिवली पूर्वेकडील पलावा येथील २६ हजार फ्लॅटधारकांना आयटीपी प्रकल्पात समाविष्ट करत मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील पलावा हा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. पलावामध्ये सुमारे २६ हजार फ्लॅट आहेत. हा आयटीपी प्रकल्प असून या प्रकल्पधारकांना नियमानुसार मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.

आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण , खासदार श्रीकांत शिंदे, पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत या प्लॅटधारकांच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे २६ हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयानंतर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. 

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...