नागपूर येथे राज्यस्तरीय महायोगोत्सव- २०२३ चे आयोजन कार्यक्रम स्थळाची पाहणी करून घेण्यात आला आढावा !!
ठाणे, उदय दणदणे :
रविवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी, राज्यस्तरीय महायोगोत्सव-२०२३ नागपूरसाठी, महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व मुंबई जिल्ह्या अध्यक्ष संतोष खरटमोल यांनी महायोगोत्सव २०२३ साठी नागपूर येथे जाऊन पाहणी दौरा केला.
या दरम्यान नागपूर टीमकडून उपस्थित निरीक्षक प्रसाद कुलकर्णी व संतोष खरटमोल यांचे मोठया आनंदात स्वागत करण्यात आले. तसेच नागपूर स्थित डॉ. हेडगेवार भवन येथे २८ व २९ ऑक्टोबर २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय महायोगोत्सवच्या कार्यक्रम स्थळी भेट देऊन त्याची पाहणी करण्यात आली. यात सभागृह व्यवस्था, गेस्ट रूम, सदस्य बैठक व्यवस्था, साधकांची दोन दिवस राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, मान्यवरांचे व्यख्यान कशा प्रकारे करता येईल याच्यावर चर्चा करण्यात आली, नागपूर टीम कडून होणाऱ्या महायोगोत्सव मधील कामाचा आढावा घेण्यात आला. राज्यस्तरीय महायोगोत्सव मधील प्रत्येक समितींच्या कामाची विभागणी करून देण्यात आली, व प्रत्येक समितीच्या प्रमुखाला रीतसर मार्गदर्शन करण्यात आले, नागपूर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी व सदस्य हे अगदी जोमाने काम करीत आहे हे त्यांच्या कामाचा आढावा घेताना दिसून आले.
या प्रसंगी विभागीय अध्यक्ष विनायकजी बारापत्रे सर, राज्य महासचिव अमितजी मिश्रा, नागपूर जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तमजी थोटे सर, स्थानिक नियोजन समिती अध्यक्षा लताताई होलगरे जी, कोषाध्यक्षा उषाताई हिंदोरीया जी, उपाध्यक्षा सुवर्णा पाल जी, मनोहर पाल जी, ढोबळे सर, जांभूळकर सर आणि एकूण पन्नासहून अधिक सदस्य व निरीक्षक राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी व मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल उपस्थित होते.
No comments:
Post a Comment