Saturday, 7 October 2023

शहापूर तालुक्यातील कसारा विभागात शिक्षण परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकां-यांनी दिलेल्या सूचनां केंद्रप्रमुखाकडून धाब्यावर, कारवाईची मागणी ?

शहापूर तालुक्यातील कसारा विभागात शिक्षण परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकां-यांनी दिलेल्या सूचनां केंद्रप्रमुखाकडून धाब्यावर, कारवाईची मागणी ?

कल्याण, (संजय कांबळे) : राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातंर्गत सर्व स्तरावर कार्यप्रेरित होऊन १०० टक्के मुले शिकण्याच्या उद्देशाने काम केल्याने राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील शिक्षण परिषदा लाभदायक ठरत आहेत, असे असताना शहापूर तालुक्यातील कसारा विभागात या परिषदांच्या मुळ उद्देशाला हरताळ पासण्याचा प्रकार उजेडात आला असून येथे केंद्र प्रमुखाकडून चक्क ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांनी दिलेल्या सूचना व निर्देशांना पायदळी तुडवले असून या केंद्र प्रमुखांनवर कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक महेश देशमुख यांनी केली आहे.

शिक्षण परिषदा आयोजित करण्या बाबतीत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांनी काही निर्देश दिले आहेत, यामध्ये १०० टक्के वर्ग शाळा प्रगत करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचे सादरीकरण आयोजित करुन संपूर्ण केंद्र शाळाबाह्य मुल विरहित करण्यासाठीचे नियोजन व उपाययोजना १०० टक्के मुलांची नियमित उपस्थिती,वाचन कार्यक्रम, स्वच्छता प्रक्रिया, अहवालातील दर्शके, इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश करून केंद्रातर्गत सर्व शाळा १०० टक्के प्रगत करण्यासाठी चर्चा, नियोजन, कृती आराखडा या शिक्षण परिषदांच्या माध्यमातून तयार करून त्याप्रमाणे प्रत्यक्ष उदिष्ट प्राप्ती करण्यासाठी अमलंबजावणी. करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत, हे करताना ज्या ११ सूचनाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामध्ये या शिक्षण परिषदेत कोणत्याही प्रकारचे सामूहिक स्नेहभोजन, या व्यासपीठावर संघटना प्रतिनिधी सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, करु नयेत अशा स्पष्ट सूचना दिल्या असताना शहापूर तालुक्यातील कसारा विभागात केंद्र प्रमुख अशोक मोरे यांनी हे सर्व सूचना व निर्देश धाब्यावर बसवून शिक्षकांना'बिर्याणी दिली, एवढ्यावर हे महाशय थांबले नाहीत तर शिक्षकांचा लकी ड्रा, सत्कार समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम असे सर्वच उपक्रम राबविले,यामध्ये साधारण पणे ८०/९० शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले होते.

विशेष व आश्चर्याची बाब म्हणजे फेब्रुवारी२०२३ मध्ये अशाच शिक्षण परिषदेत शिक्षकांचा' झिगांट, डांन्स, मोठ्या प्रमाणात गाजला होता, यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई देखील केली होती. शिक्षण परिषदांचे आयोजन करताना शिक्षण परिषदेच्या मुळ उद्देशाला बाधा पोहचत असल्याची बाब निदर्शनास येत असून शिक्षण परिषदा संकल्पना आणि प्रक्रिया मार्गदर्शिका २०१९ यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शिक्षण परिषदांचे आयोजन केले जात नसल्याचे लक्षात आल्यानेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिंदल यांनी ११ सूचना दिल्या असून त्यांचे काटेकोर पालन करावे असे निर्देश लिखीत स्वरूपात दिले असताना कसारा विभागातील केंद्र प्रमुख मोरे यांच्या कडून मात्र त्यांना हरताळ पासला गेला आहे.त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया

*श्री चव्हाण (गटशिक्षणाधिकारी, शहापूर) __
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण परिषदांच्या आयोजनाबाबतीत ज्या सूचना व निर्देश दिले आहेत त्यानुसार शिक्षण परिषदा घ्याव्यात यासाठी मी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, शिक्षक यांची बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या, तरीही असे घडले असल्यास याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.

*महेश देशमुख (समाजसेवक व भाजपा मंडळ, अध्यक्ष) कल्याण __
या बाबतीत मला माहिती मिळताच मी स्वतः व काही कार्यकर्ते पालक यांच्या कडून माहिती घेतली असता कसारा विभागात असे झाल्याचे पुरावे मला मिळाले आहेत, त्यामुळे अशा केंद्र प्रमुखावर कारवाई करावी म्हणून सीईओ ना पत्र देणार आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...