डेरवण येथील स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल कळंबटच्या विद्यार्थ्यांचे यश संपादन !!
प्रतिनिधी - निलेश कोकमकर
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण संचलित न्यू इंग्लिश स्कूल कळंबट या माध्यमिक विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करून खेळात यश संपादन केले आहे. यामध्ये ३ कि. मि. चालणे या प्रकारामध्ये नंदिनी अनंत वीर हिने प्रथम क्रमांक, २०० मिटर धावणे या प्रकारामध्ये तनवी अनंत वीर हिने व्दितीय क्रमांक, उंच उडी या प्रकारामध्ये तनवी जानू निर्मळ हिने व्दितीय क्रमांक आणि थाळी फेक या प्रकारामध्ये मुद्रा संजय पुरंदरे हिने तृतीय क्रमांक पटकावला असून नंदिनी अनंत वीर आणि तनवी अनंत वीर या दोघींची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. महेंद्र शिरकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदनाचा वर्षाव होत असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment