Thursday, 5 October 2023

यंदाही घाटकोपर मध्ये हायटेक साजरा होणार श्री रामलीला महोत्सव !!

यंदाही घाटकोपर मध्ये हायटेक साजरा होणार श्री रामलीला महोत्सव !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

        श्री रामलीला महोत्सव समितीची कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. श्री रामलीला संदर्भात कार्यकारिणीच्या बैठकीत रामलीला रंगवण्याची रूपरेषा ठरविण्यात आली. गेल्या 60 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या रामलीला महोत्सव समितीने यावर्षीही हायटेक रामलीला आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत सुनील दामोदर दुबे यांची नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक रमापती दुबे यांची बिनविरोध निवड झाली. या सोबतच रामसूरत पांडे यांना संवर्धन मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले. दुबे यांनी सांगितले की, यंदा हायटेक आणि आधुनिक साधनसामग्रीने सुसज्ज असलेल्या घाटकोपरमध्ये रामलीलाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यकारिणीच्या बैठकीत सरचिटणीस संजय सिंग, कोषाध्यक्ष सनत पाटील, डॉ. ओझा, अंगद गिरी, जिग्नेश पटेल, अनिल चौरसिया, संदीप सिंग, हरीश दुबे, संजय उपाध्याय, विनय तिवारी, शिवकुमार पांडे, सुनील यादव, चंद्रदेव पांडे, संतराज चौरसिया, प्रवीण चौरसिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...