"दादा - वहिनीं"चे लाभले अतूट प्रेम !!
आयुष्याच्या जडणघडणीत ज्या व्यक्तींचे योगदान असते त्यात माझे मोठे बंधू श्री. दत्ताराम ल. गुडेकर आणि वहिनी सौ. शोभा द. गुडेकर, दोन नंबर भाऊ श्री. तुकाराम ल. गुडेकर, सौ. सुमन तु. गुडेकर यांची नावं अगत्याने घावी लागतील. त्यांच्या बरोबरीने दोन बहिणी मंजुळा (कै. वनिता वसंत डांगे) आणि पुष्पा (सौ. गीता वामन रेवाळे) यांनी माझा लहानापासून सांभाळ केला. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या सर्वांचा मला आधार मिळालाय. आई-वडील वारल्यावर त्यानंतर त्यांनीच मला आई-वडिलांचं प्रेम दिलं. त्या प्रेमाची शिदोरी घेऊनच मी माझ्या आयुष्याची वाटचाल करत आहे. या अतूट प्रेमाची मला नेहमीच यांची जाणीव होते. मला साधा सर्दी-ताप असला तरीही काळजी करणारे माझे भाऊ, वहिनी यांचे हे किती अलौकिक प्रेम नाही का?
माझ्या मोठया भावाचे लग्न मी इ. दुसरीला असताना झाले. तेव्हा आई -वडील होते. तरी सुद्धा वहिनीने तेव्हांपासून आम्हा सर्व भावंडाना संस्कार देऊन योग्य मार्गाला लावलं. सर्वांच्या चुका पोटात घालून लहानाचं मोठं केलं. गावी आई - बाबा, दोन बहिणी आणि मी असे सर्व गावी रहात होतो. दोन्ही भाऊ मुंबईला नोकरीनिमित्त असायचे. आम्ही सर्वआई -बाबा आणि भावंडं मिळून एकूण ६ जणं गावी राहायचो. पण किती ओलावा होता त्या प्रेमात ! त्यांचा मी फार फार ऋणी आहे आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच केला.
मी आठ वर्षाचा असताना मला पोट दुःखण्याचा सतत त्रास होत होता. अनेक दिवस देवरुख येथील मातृ मंदिर या रुग्णालय मध्ये ठेवावे लागलं होतं. आई -बाबा माझ्या सोबत असताना मोठया वाहिनीने सर्व जबाबदारी घेऊन घर सांभाळून सर्व नीट केले होते. तेव्हा तर त्यांनी मला मरणाच्या दारातून खेचून आणलं होते. त्याचवेळी दुष्काळही पडला होता. तरीही दोन्ही भावांनी आम्हाला नीट सांभाळून ठेवलं होतं. घरी तांदूळ तर बेपत्ताच झाला होता. अशा वेळी माझ्यासाठी कुठून तरी तांदूळ आणायचे आणि फक्त मला भात करून खायला द्यायचे. त्यांना वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळेच त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मता दृष्टिकोन अधिक वाढला. त्यानंतर इ.४ थी मध्ये असताना दोन नंबर भावाचे लग्न झाले. नवीन वहिनी पण माझ्याशी व माझ्या दोन बहिणी आणि माझे आई -बाबा यांच्याशी प्रेमाने वागत होती. त्यानंतर घरात ७ माणसं राहत होतो. दोन भाऊ मुंबई येथे होते. त्यानंतर दोन्ही वहिनी यांना पुढे मुले झाली. घराचे गोकुळ झालं होतं. मी १९८९ ला एस. एस. सी. पास होऊन पुढे मुंबई ला भावाकडे आलो. १९९३ ला लांजा तालुक्यातील भांबेड गावातील श्री. काशीराम ना. शिवगण यांच्या मोठया मुलीशी (संगिता) बरोबर विवाह झाला. माझी पत्नी सौ. संजीवनी शां. गुडेकर हिने कायम मला माझ्या कठीण परिस्थितीत साथ दिली. आजही देत आहे. आम्हाला दोन मुली (निशा, सुचिता) आणि एक मुलगा (उत्कर्ष) आहे. दोन्ही मुली विवाहित असून आम्हाला एक गोड असा सहा वर्षाचा (कु. सिद्धांत सु.घोडेस्वार) नातू आहे. आमचा पण संसार सुखात सुरु आहे. तरी सुद्धा आम्ही गावी गेल्यावर आमच्या या दोन्ही भावांचे आणि वाहिन्यांचे प्रेम कमी अजिबात झालेलं नाही. अशा या माझ्या दोन्ही मोठया दादा-वाहिनीला चांगले आरोग्य, दीर्घ आयुष्य लाभू दे. त्यासाठी त्यांना या लेखाच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचा आयुष्याचा सकारात्मक विचार आम्हालाही येवो हीच ईश्वर श्री मार्लेश्वर चरणी प्रार्थना. तसंच दादा-वहिनीने माझ्यावर इतकी वर्ष आई-वडिलांचं प्रेम दिल्याबद्दल त्यांचे कोटी-कोटी आभार.
श्री. शांताराम ल. गुडेकर (+91 98207 93759)
दै. अग्रलेख
मुंबई /कोकण विभागीय संपादक
मा. विशेष कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र शासन
सदस्य - महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग
महाराष्ट्र शासन
लेख वाचून आनंद झाला. आजकालच्या व्यवहारी जगात माणसातल्या नात्यांमधली संवेदनाशीलता नष्ट होत चाललेय. अशा स्थितीत आपला लेख कृतज्ञता व्यक्त करणारा नातेआणि नाते संबंध वृध्दींगत करणारा आहे.
ReplyDelete