कल्याण, सचिन बुटाला दि.०२ : आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांची भेट घेऊन पलावा येथील रहिवाशांना मालमत्ता करत ६६ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले तसेच या परिसरातील नागरिकांना टॅक्स कसा लावण्यात येईल, त्यांना टॅक्स कसा येईल याबाबत जनजागृती शिबिर घेण्याचे मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मानकोली पुलाची अलाइनमेंट चुकली, तांत्रिक कारणामुळे हा पूल पुढे उतरवण्यात आला आहे त्याचं नियोजन कसं करणार, ठाकुर्लीच्या रखडलेल्या पुलाबाबत पुढे काय करणार याबाबत चर्चा केली.
डोंबिवली पश्चिम येथे जवळपास एक लाखांच्या आसपास घर आहेत. मात्र या ठिकाणी महावितरणाचे सब स्टेशन नाही. त्यामुळे महापालिकेने महावितरणच्या सबस्टेशनसाठी डोंबिवली पश्चिममध्ये भूखंड उपलब्ध करून द्यावा, महानगरपालिकेत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे त्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले, कल्याण, डोंबिवली स्टेशन परिसरात तसेच लोढा व इतर परिसरात फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे, यात सर्वच फेरीवाले हे गरजवंत किंवा गरीब नसून यात अनेक असामाजिक तत्वं आहेत. जे खरेच फेरीवाले आहेत त्यांना जागा द्या, जे अधिकाऱ्यांवर हल्ले करतात किंवा जे असामाजिक आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावी व क्रिमिनल केसेस दाखल कराव्यात अशी मागणी केली.
आयुक्तांनी माणकोली पुलासंदर्भात एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेणार असून, ठाकुर्ली पुलाबाबत लाभार्थ्यांना मोबदला देण्याचे व फेरीवाल्यांचे निश्चित धोरण आखण्याचे आश्वासन दिले, यावेळी आमदार राजू पाटील यांच्या सोबत डोंबिवली मनसेचे शहर प्रमुख राहुल कामत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment