Friday, 24 November 2023

कांबा येते आढळला भला मोठा अजगर !!

कांबा येते आढळला भला मोठा अजगर !!


कल्याण, प्रतिनिधी : कांबा गावा जवळ सुरु असलेल्या बांधकामच्या ठिकाणी रात्री 1 भला मोठा अजगर शिरल्याने मजदूरांमध्ये धावपळ झाली तेव्हा त्यांनी वॉर फाउंडेशन च्या मदत क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा प्राणी मित्र योगेश कांबळे, संतोष पंडागळे, पार्थ पठारे, अथर्व येरापनोर व प्रेम आहेर ह्यांनी त्वरित घटना स्थळी जाऊन अजगरचा सुखरूप बचाव केला व अजगर हा पूर्ण पणे बिनविषारी सर्प असून त्यापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो अशी माहिती कामगारांना दिली.


          बचाव केला गेलेला अजगर सुमारे 8 फूट लांबीचा असून त्याला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती वैद्यकीय तपासणी करून लवकरच निसर्गमुक्त करणार असल्याचे सांगितले तसेच आपल्या राहत्या घरात किंवा परिसरात सर्प किंवा इतर वन्यजीव शिरल्यास त्यांना न मारता वॉर फाउंडेशनच्या 8856002566 ह्या मदत क्रमांकावर संपर्क करावा हे आव्हान वॉर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. योगेश कांबळे ह्यांनी केले.

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !!

वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक !! कल्याण, प...