व्हाईस ऑफ मिडीया च्या कल्याण तालुका अध्यक्षपदी जगदीश खंबाळे यांची नियुक्ती !!
कल्याण - (जैनेंद्र सैतवाल) :
पत्रकारांच्या समस्या व न्यायासाठी सतत कार्यरत असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य पत्रकार संघटना "व्हाईस ऑफ मिडीया" च्या कल्याण तालुका अध्यक्ष पदी जगदीश खंबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. असे ठाणे जिल्हा निरीक्षक मंगल डोंगरे यांनी जाहीर केले. या वेळी जिल्हा अध्यक्ष अरुण ठोम्बरे हेही उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या कल्याण येथील विश्राम गृहात अध्यक्ष व विविध पदाधिकारी यांची निवड जिल्हा निरीक्षक, अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष म्हणून अशोक कांबळे, सह कार्याध्यक्ष जितेंद्र कानडे, सचिव कुणाल म्हात्रे, खजिनदार राजू कौतकर, सह खजिनदार सचिन मांजरे, संघटक जैनेंद्र सैतवाल, सह संघटक विलास भोईर, सह संघटक प्रथमेश कांबळे, सल्लागार दत्तात्रय बाठे , सल्लागार मनोज ताठे यांची निवड करण्यात आली.
ठाणे जिल्हा पदाधिकारी, कल्याण शहर कार्यकारिणी तसेच पत्रकार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment