Saturday, 9 December 2023

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कल्याण मधील शेतकऱ्यांला पंचनाम्यानंतरही नुकसान भरपाई नाही, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती इतर ठिकाणी काय?

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कल्याण मधील शेतकऱ्यांला पंचनाम्यानंतरही नुकसान भरपाई नाही, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही परिस्थिती इतर ठिकाणी काय?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील पिंपळोली गावचे प्रगतीशील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांच्या भाजीपाला पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, याचा पंचनामा देखील झाला, मात्र आज ५/७ महिन्यानंतरही त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, ते मदतीच्या आशेने सरकारी कार्यालयाचे खेटे घालत आहेत परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे, त्यामुळे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील ही शेतकऱ्यांची ही अवस्था तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

तालुक्यातील गोवेली पिंपळोली गावचे प्रगतीशील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांनी त्यांच्या सव्ह्रे क्र१०/२ब मधील ०.९१,० हे आर इतक्या क्षेत्रावर वेलवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड केली होती. यामध्ये काकडी, घोसाळी व शिरोळे (दोडका) या पिकांचा समावेश  होता, पिक देखील जोमदार आले होते, मात्र १५ जुलै रोजी जोरदार वादळी पाऊस झाला, यामुळे संपूर्ण मांडव कोसळला, यामुळे ५०० किलो काकडी, ५०० किलो घोसाळी आणि ३०० किलो शिरोळे (दोडका) याचे नुकसान झाले होते, यानंतर रायते तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक, यांच्या समक्ष पंचनामा देखील झाला, साधारण पणे ५० हजाराच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र याला आज ५/७ महिने होऊनही एक दमडी ही मदत या शेतकऱ्यांला मिळाली नाही. हे शेतकरी काही तरी मदत मिळेल म्हणून कल्याण तहसीलदार, कृषी विभाग, व पंचायत समिती येथील कार्यालयात खेटे मारत आहेत, मात्र प्रत्येक वेळी निराशाच त्यांच्या पदरी पडत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील शेतकऱ्यांना कित्येक लाखांची मदत केली असल्याचे ठासून सांगत होते, शिवाय शासन आपल्या दारी कार्यक्रमाव्दारे किती लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे सांगुन स्वतः ची पाठ थोपटून घेत आहे. 

शेतकरी, बळीराजा हे सरकारचे मायबाप आहेत अशा वल्गना करत आहेत. मात्र त्यांच्या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या कित्येक महिन्यापासून मदतीपासून वंचित आहे, हे शासन केवळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी करत आहे, धनदांडग्याना पोसत आहे, मात्र जगाच्या पोशिंदाला वा-यावर सोडत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मधुकर रोहणे या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कापलेले भात शेतातील पाण्यात कुजले मात्र याचा पंचनामा करण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आले नाहीत असे याच गावातील कृष्णा बाबू मिरकुटे या शेतकऱ्यांने सांगितले.

एकूणच पाहिले तर ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो, त्यांच्या जिल्ह्यातील 'बळीराजा, ची अशी परवड होत असेल तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असलेल्या या ट्रिंबल इंजिन सरकारने गतिमान, वेगवान निर्णय घेऊन' सिंगल, सिंगल  शेतकऱ्यांला मदत करावी ऐवढीच माफक अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...