जव्हार महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थशास्त्रीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जव्हार, जि. पालघर या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी, मनातील भीती नाहीशी व्हावी, स्पर्धा परीक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण व्हावा, परीक्षेचे स्वरूप कळावे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्या त्यासाठी MPSC, UPSC व इतर सरळसेवा परिक्षेसारखी अर्थशास्त्र विषयावर स्पर्धा परीक्षा महाविद्यालयामध्ये दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली. सदर परीक्षा १०० गुणांची घेण्यात आली आणि त्यासाठी एक तास वेळ देण्यात आला. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयाच्या गं. भा. सरदार हॉल मध्ये घेण्यात आली.
स्पर्धा परीक्षेसाठी महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य या शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सदर स्पर्धा परीक्षेस कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी असे एकूण ४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेमधून पहिल्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम सर व उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय शिंदे यांनी सदर परीक्षेचे आयोजन केले. तसेच संयोजक म्हणून डॉ. विनायक खातळे, प्रा. सुधिर भोईर आणि प्रा. प्रविण नडगे यांनी काम पाहिले.
No comments:
Post a Comment