Wednesday, 10 January 2024

कल्याण पश्चिम येथे शिवसेनचा विजयाचा जल्लोष !

कल्याण पश्चिम येथे शिवसेनचा विजयाचा जल्लोष !


कल्याण , नारायण सुरोशी : शिवसेना (शिंदे गट) हीच खरी शिवसेना व १६ आमदारांना पात्र ठरविले, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देताच, कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौकात महाराजांना मानवंदन करुन फटाके फोडून, घोषणाबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.


यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, अनेक माजी नगरसेवक व नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की हा बहुमताचा विजय आहे. आम्ही लोकशाही ला मानणारे असून विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला हा निर्णय लोकशाहीचा विजय आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...