Monday, 15 January 2024

मकर संक्रांतीदिनी लहान मुलांना पतंगांचे वाटप !!

मकर संक्रांतीदिनी लहान मुलांना पतंगांचे वाटप !!

मुंबई, (संतोष गावडे) :

          अंधेरीत सागबाग येथे शिवसेना  शाखा ८६ (ऊबाठा) च्या अंतर्गत उपशाखप्रमुख श्री. राजुदादा सुर्यवंशी यांच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधत लहान मुलांसाठी पतंगाचे वाटप करण्यात आले. 
       श्री भैरवनाथ जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अनेक प्रकारे उलथापालथ होऊनही आजही शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले (ऊ बा ठा) असलेले श्री राजुदादा सुर्यवंशी दरवर्षी मकर संक्रांतीचे औचित्य साधत लहान मुलांसाठी पतांगांचे वाटप केले गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. यावेळी संक्रांतीच्या सणासाठी महत्वाचे असलेले तिळाचे लाडू सुद्धा मुलांना देण्यात आले.
       शाखा ८६ चे शाखाप्रमुख बिपिन शिंदे, आलम सलमानी, सतिश शेडगे, विजय राय, गुलाब यादव, नितीन मते, विनीत सिंह, देवी अल्ले, रामविलास मौर्य, एकनाथ नाचणकर,लक्ष्मण घाग, यशवंत कुंभार, दीपक घाग, शुभम सुर्यावशी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्थानिक नागरिक आणि विभागातील सर्व लहान मुले उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...