Thursday, 18 January 2024

शिव स्वराज्य प्रतिष्ठान ( रजि.) संस्थेचा ६ वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

शिव स्वराज्य प्रतिष्ठान ( रजि.) संस्थेचा ६ वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई - ( दिपक कारकर )

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपरोक्त संस्थेचा ६ वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा - २०२४ रविवार दि.२१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ०९ : ०० वा.नूतन विद्यालय, नगीनदास पाडा, नालासोपारा ( पूर्व ) येथे संपन्न होणार आहे. ह्या सोहळ्याला प्रमुख वक्ते मिलिंद पाटील सर,प्रमोद घाडी सर तर प्रमुख पाहुणे अनंत फिलसे ( सामजिक कार्यकर्ता ), किशोर भेरे ( समाजसेवक ), तुकाराम पाष्टे,दिनेश शिंदे ( वकील ), बाळकृष्ण म्हस्कर,विजय पडवळ, दिपक मांडवकर ( पत्रकार ), अविनाश पाचकळे आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रतिवर्षी प्रतिष्ठान सामाजिक बांधलकी जपण्याचा प्रयत्न करत ऋणानुबंध जपते आहे. ह्या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव देखील करण्यात येणार आहे. सदर सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास सुवरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...