Wednesday, 3 January 2024

आंतरशालेय स्पर्धेत शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाचे घवघवीत यश !!

आंतरशालेय स्पर्धेत शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाचे घवघवीत यश !!

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

               बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने घाटकोपर विभागातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांतील विद्यार्थी व सेवक यांच्यासाठी विविध आंतरशालेय क्रीडास्पर्धांचे आयोजन विभाग निरीक्षक गोरखनाथ भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी शिक्षण संस्थेच्या आधुनिक पध्दतीने बनवलेल्या क्रीडांगणात करण्यात आलेले होते. घाटकोपरमधील पहिली ते चौथीच्या एकूण आठ शाळांमधून सुमारे ६३ विद्यार्थी व ४ सेवक यांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव श्रीकांत नरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रवींद्र बडवे, समन्वयक स्नेहा सुभेदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. क्रीडास्पर्धेसाठी धनंजय बांगर, उल्हास विशे, धोंडिराम दळवी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. क्रीडास्पर्धेचे सूत्रसंचालन संदीप परब यांनी केले. शिवाजी शिक्षण संस्थेचे शिक्षकवृंद व सेवक यांनी या क्रीडास्पर्धेच्या आयोजनासाठी उत्तमरित्या सहकार्य केले. सदर घेण्यात आलेल्या क्रीडास्पर्धांमध्ये शिवाजी शिक्षण संस्था प्राथमिक विद्यालयातील जवळपास सर्वच स्पर्धक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून घाटकोपर विभागासह शिक्षण विभागातही शाळेचे नाव उंचावले. इ.पहिली- मध्ये तोल सांभाळणे स्पर्धेत अनुज अपराध ( तृतीय क्रमांक), मानसी घोलप (उत्तेजनार्थ), इ.दुसरी - मध्ये लंगडधाव स्पर्धेत कृष्णा मोरे (उत्तेजनार्थ), इ. तिसरी - मध्ये टोपलीत चेंडू वेचणे स्पर्धेत स्वयम घाणेकर (प्रथम क्रमांक), मनस्वी पालेकर (प्रथम क्रमांक), इ.चौथी- मध्ये दो-यात मणी ओवणे स्पर्धेत श्रेयस कदम (द्वितीय क्रमांक), श्रध्दा मानकर (द्वितीय क्रमांक) प्राप्त केले.

No comments:

Post a Comment

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय...