Monday, 8 January 2024

ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशन च्या वतीने गरजूंना कंबल वाटप..

ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशन च्या वतीने गरजूंना कंबल वाटप..

ठाणे , प्रतिनिधी : ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशन च्या वतीने व "एक हात मदतीचा" ह्या उपक्रमाच्या अनुषंगाने कै. कृष्णा दाभाडे साहेब यांच्या जन्मदिना निमित्ताने कै. दाभाडे साहेब यांचे विश्वासू मित्र सचिन साहनी  यांच्या सहकार्याने व ऑल इंडिया क्राईम कंट्रोल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष महादेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे रेल्वे स्टेशन व तलावपाली च्या परिसरा मध्ये गरजू व वंचित लोकांना दिनांक - ०२ जानेवारी  कै. कृष्णाजी दाभाडे यांच्या जन्मदिना निमित्ताने कंबल (ब्लेंकेट) वाटप करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

तसेच संस्थेचे अध्यक्ष महादेव शिंदे, सचिव साईनाथ खरात, उपाध्यक्ष नर्सिमुल्लू कट्टा, सचिन साहनी, उषा जाधव, शोभा गायकवाड, हसन शेख, ज्योती चव्हाण, मनोज जाधव, शंकर यादव, प्रदीप कांबळे, नामदेव घाडीगावकर, नेहा कांगणे, सरिता अहिरे, गौरव मिश्रा, राजकुमार केसरवानी व इतराने सदर सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !!

कल्याण येथे माईसाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह नवविवाहित दाम्पत्यांचा सत्कार !! संदीप शेंडगे... कल्याण ...