Monday 29 January 2024

अनेक वर्षे अविरतपणे यशस्वी वाटचाल करणाऱ्या नवतरूण मित्र मंडळ मुंबई संस्थेतर्फे कोकणच्या नमनचे आयोजन !!

अनेक वर्षे अविरतपणे यशस्वी वाटचाल करणाऱ्या नवतरूण मित्र मंडळ मुंबई संस्थेतर्फे कोकणच्या नमनचे आयोजन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /दीपक कारकर) :
                अनेक वर्षे विविध क्षेत्रात अविरतपणे यशस्वी वाटचाल करणाऱ्या नवतरूण मित्र मंडळ मुंबई संस्थेतर्फे कोकणच्या नमनचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे मांडरकरवाडी या वाडीमधील रहिवासी नोकरी, काम-धंदा निमित्ताने मुंबईत स्थानिक होऊन नवतरूण मित्र मंडळ मुंबई या मंडळाची स्थापना केली. अनेक वर्षे कार्यरत असलेले मंडळ या मंडळाने गेल्या वर्षी जय मानोबा मंदिर जिर्णोध्दार निधीसाठी कोकणची लोककला बहूरंगी नमन आयोजित केले होते. मंडळाचे शिलेदार अध्यक्ष-अशोक मांडरकर, सचिव- गणपत निवळेकर, खजिनदार- नारायण मांडरकर‌ आणि सर्व कार्यकारी कमिटी सभासद यांनी कोकणच्या मातीतील कला जपावी म्हणून पुन्हा एकदा श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ मावळंगे (मांडरकरवाडी), यांचे बहूरंगी नमन रविवार दि.४ फेब्रुवारी २०२४, रोजी दुपारी ४ वा. मुंबई मधील नाविन्यपूर्ण नाट्यगृह साहित्य संघ मंदिर चर्नी रोड गिरगाव येथे आयोजित केले आहे. गेल्या वर्षी याच रंगमंचावर लोककला जोपासण्याचा प्रयत्न केला. रसिक प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. वेगवेगळे विषय हाताळत ह्या संपूर्ण टिमने समाजात आणि रंगमंचावर कलाविष्कारात अस्तित्व जपल. यावर्षी पुन्हा नव्याने २५ हौशी कलाकार घेऊन रंगमंचावर उभे राहणार आहेत. पुरूष पात्र स्त्री पात्राचा साजशृंगार करून गणगौळण आणि कैदी चंदनपूरचा ही  नाट्यकृती सादर करणार आहेत. नाट्यकृती लेखक- संदिप कानसे, दिग्दर्शक -दिनेश गं. मांडरकर यांनी केलं आहे. गीतकार-गोपाळ करंडे, गायक- दिनेश मांडरकर, वेदांत मांडरकर, विनायक मांडरकर. कार्यक्रमाचे सुञधार-किशोर मांडरकर, तुकाराम मांडरकर, मार्गदर्शक -सुरेश मांडरकर, दत्ताराम मांडरकर यांनी केलेले आहे. तरी कोकणातील नमन, शक्ती -तुरा कलाप्रेमी रसिक मायबाप उपस्थित राहून कला जोपासण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...