Saturday, 13 January 2024

कल्याण (प.) चे आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भानूनगर मधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन !!

कल्याण (प.) चे आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते भानूनगर मधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन !!

कल्याण, नारायण सुरोशी : बैलबाजार, भानूनगर (प्रभाग क्रमांक ३६) मधील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन मा.सभागृह नेते, ज्येष्ठ नगरसेवक 'स्व.प्रकाश पेणकर' यांच्या जयंतीचे औचित्य साधून कल्याण (प.) विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा.श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या कामासाठी श्री.प्रतिक पेणकर यांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यासाठी लागणारा निधी आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांनी *विशेष निधीतून* उपलब्ध करून दिला आहे. प्रभाग क्र-३६च्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून मा. सभागृह नेते स्व. प्रकाश पेणकर यांनी या प्रभागात सुरू केलेली विकासाची गंगा यापुढे देखील अशीच अखंडित सुरू राहील अशी ग्वाही आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांनी यावेळी बोलताना दिली. 

या भूमिपूजन समारंभाला युवासेना राज्य सहसचिव श्री.प्रतीक पेणकर, श्री.प्रणव पेणकर, अशपाक टाकली, रूबेद मजीद, विमल पटेल, मुस्ताक भाई, रिंकू नट, मोहीश भाई, नसरुद्दीन साबुवाला, अँड. नायर साहेब, अलीम खान यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !!

उरण येथील पत्रकार हेमंत चव्हाण यांना संगणक भेट !! उरण  दि २९, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथील ज्येष्ठ पत्रकार हेमंत चव्हाण यांना य...